सरकारी दडपशाही थांबवा, अन्यथा असंतोषाला तोंड द्यावे लागेल - सिद्धार्थ मोकळे


मुंबई (प्रतिनिधी) दि. २९ -: राज्यात सातत्याने जातीय अत्याचाराच्या घटना घडत असून सरकार आणि पोलीस यंत्रणा पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एफआयआर नोंदवण्यात दिरंगाई करण्यापासून ते पुरावे नष्ट करण्यास वाव देणे, चुकीचे जबाब नोंदवणे, आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणे, आणि पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल करणे, इत्यादी प्रकारे दडपशाही करण्याचा प्रकार सरकार आणि पोलीस यंत्रणा करीत आहेत. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे.
                या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. नाशिक येथे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 'फिजिकल डिस्टनसिंग'चे पालन करीत आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्याच दिवशी पुण्यात चिनी मालाच्या विरोधात ब्राह्मण संघटनेच्या लोकांनी 'फिजिकल डिस्टनसिंग' न पाळता केलेल्या आंदोलनात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सोलापुर मध्ये आंदोलन करणाऱ्या अभिषेक शिंगे व अतिष बनसोडे या दोन तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र शरद पवारांवर टीका झाली म्हणून राज्यभर निषेध आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कुठेही गुन्हे दाखल झाले नाहीत. महाआघाडी सरकारचा हा दुटप्पीपणा आमच्या लक्षात आला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूडभावनेने कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व तपासात दिरंगाई तसेच खोटे गुन्हे दाखल करून प्रकरण दडपणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते तसेच आता महाआघाडी सरकारच्या काळातही अडकवण्यात येत आहे. सरकार बदलले मात्र आमचा अनुभव नाही बदलला, सरकारी दडपशाही सुरूच आहे. सरकारने वेळीच पोलीस यंत्रणेमार्फत होणारी दडपशाही थांबवावी अन्यथा सरकारला मोठ्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल. असा इशारा सिद्धार्थ मोकळे यांनी दिला


Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर