चिनी वस्तू वर भारतीय नागरिकांनी बहिष्कार टाकला पाहिजे -दिलीप जोशी
परळी (प्रतिनिधी) -: चीनने भारतीय सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण करीत 20 भारतीय जवानांचा बळी घेतला आहे. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून चीन महासत्ता बनण्याचे स्वप्न पहात असून आता सावध होण्याची व चीन निर्मिती वस्तूवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची गरज असल्याचे वंदे मातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जोशी यांनी बोलताना सांगितले. दरम्यान चीनला वठणीवर आणण्यासाठी भारतीय जवान सक्षम असून त्यांना साथ म्हणून चिनी वस्तू वर भारतीय नागरिकांनी बहिष्कार टाकला पाहिजे असेही दिलीप जोशी म्हणाले.
चीनने गलवान क्षेत्रात भारतीय जवानांना सोबत केलेला संघर्ष भारतीयत्व जागरूक करण्यासाठी महत्त्वाचा असून आता सावध होतानाच ची निर्मिती सर्वच वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे आपला व्यापार वाढतो म्हणून चिनी वस्तू विकणे सुद्धा वापरणे थांबवले पाहिजे. व्यापारपेक्षा आपले देशहित महत्त्वाचे असून चिनी मालावर बहिष्कार टाका तेंव्हा भारतीय नागरिक अशा वस्तू घेणे टाळतील अशी प्रतिक्रिया वंदेमातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जोशी यांनी दिली.
चीन आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचे स्वप्न पहात आहे चिनी वस्तू दिसायला आणि वापरायला चांगल्या असल्या तरी त्या आपण खरेदी करत असल्याने चीनची अर्थव्यवस्था सुधारत आहे. वाढत चाललेली चिनी वस्तूंची मागणी या अर्थव्यवस्थेला पूरक असून ती आपण सजग नागरिक म्हणून हाणून पाडू शकतो. अर्थव्यवस्था ढासळण्यासाठी जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रांनी चिनी वस्तूवर बहिष्कार सुरू केला आहे. भारतीय दूरसंचार निगमने व भारतीय रेल्वे विभागाने चीनचे तंत्रज्ञान वापरण्यास विरोध केला आहे. मंजूर असलेली निविदा त्यांनी रद्द केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता दोन पावले पुढे टाकत धमकावणे पेक्षा मुहतोड जवाब दिला पाहिजे असेही दिलीप जोशी म्हणाले .
Comments
Post a Comment