बीड जिल्ह्यातून आज तपासणीसाठी कालच्यापेक्षा अधिक कोरोना अहवालJune 7, 2020 वाढलेल्या अहवालांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे , पहा रुग्णालयनिहाय माहिती


बीड (प्रतिनिधी)-: जिल्ह्यातून आज तपासणीसाठी कालच्यापेक्षा अधिक कोरोना अहवाल
या वाढलेल्या अहवालांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे , पहा रुग्णालयनिहाय माहिती
कोरोना स्पेशल :- बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात यावा म्हणून प्रशासन, नागरिक मोठ्या शर्तीने प्रयत्न करत आहेत. काल जिल्ह्यात 2 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 62 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. आज रविवार रोजी बीड जिल्ह्यातून 76 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून संध्याकाळी याबाबतचे रिपोर्ट्स येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 5.15 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1) जिल्हा सामान्य रुग्णालय 06
2). सी सी सी बीड 09
3) स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म. अंबाजोगाई 06
4)सी सी सी आंबाजोगाई 25
5) उपजिल्हा रुग्णालय केज20
6) ग्रामीण रुग्णालय, आष्टी 02
7) ग्रामीण रुग्णालय, माजलगाव 00
8) पजिल्हा रुग्णालय,गेवराई 00
9) उपजिल्हारुग्णालय,परळी 08
असे आहेत …

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला