ना.अजितदादा पवार,ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वॉट्सअॅप मेसेजद्वारे 10 वी,12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - चेतन सौंदळे


परळी (प्रतिनिधी) -: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान वॉट्सअॅपद्वारे 10 वी,12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन करणार असल्याची माहिती परळी नगर परीषदेचे नगरसेवक तथा शिक्षक समुपदेशक चेतन सौंदळे यांनी दिली आहे.

सध्यास्थितीत कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील/ जिल्हयातील सर्वच घटकांवर परिणाम झालेला आहे.तसेच शाळा,महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे सामाजिक,भावनिक व मानसिक आरोग्य चांगले रहावे त्यांच्या मनातील भीती, ताण व नैराश्य दूर करून त्यांना शिक्षणाविषयी व इतर बाबतीत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी मो.क्र.9422930599 व समुपदेशक श्री.सुनील गर्जे मो.क्र.9075401097 यावर वॉट्सअॅप मेसेजद्वारे विद्यार्थी, पालक संपर्क करून मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतात.
1 मे 2020 रोजी दहावीचा कलचाचणी  अहवाल www.mahacareermitra.in या वेबसाईटवर व mahacareermitra app वर जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा विद्यार्थी आपला कल व अभिक्षमता अहवाल याविषयी समुपदेकांशी विनामूल्य मोबाईलद्वारे संपर्क साधून करिअर क्षेत्राविषयी माहिती प्राप्त करू शकतात.
तसेच महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी *www.mahacareerportal.com* या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आयडी व 123456 हा पासवर्ड टाकून लॉग इन होता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना *करियरविषयी माहिती* (५५० हून अधिक करीयर्स), *कॉलेज डिक्शनरी* (२१००० हून अधिक कॉलेजेसची माहिती), *परीक्षा डिक्शनरी* (११५० हून अधिक प्रवेश परिक्षांची माहिती),* *स्कॉलरशिप, स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी* *(११२० हून अधिक शिष्यवृत्त्या ) या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल. तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन समुपदेशक चेतन सौंदळे व सुनील गर्जे यांनी केले आहे.*

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला