पंकजाताईंच्या वाढदिवसा निमित्त 1042 कुटुंबाना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे करणार वाटप भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांचा उपक्रम


परळी (प्रतिनिधी) -: माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचा दि.26 जुलै रोजी वाढदिवस असुन यानिमीत्त भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांच्या वतिने रोगप्रताकारक शक्ती वाढवणार्या व भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम -30 या होमिओपॅथी  गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असुन परळी शहरातील 1042 कुटुंबांना या गोळ्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांनी दिली.  
    माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांच्या वतिने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत परळी व परिसरात मागील काही दिवसात कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे दररोज बाधीत रुग्ण आढळत असुन या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी प्रशासनाच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतपर्यंत पोंहचत नाहीत.कोरोना विषाणुची लागण होवु नये यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती प्रभावी असावी लागते ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आर्सेनिक अल्बम -30 या गोळ्या प्रमाणीत केलेल्या आहेत हे रोगप्रताकारक बुस्टर आणी प्रतिबंधक होमिओपॅथी औषध आहे.  भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांच्या वतिने शहरातील 1042 कुटुंबांना या गोळ्यांचे पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात येणार आहे.या गोळ्या नागरीकांना घरपोंहच देण्यात येणार आहेत सोबत गोळ्या घेण्याची पध्दत व फायदे सांगण्यात येणार असल्याचे भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला