वैद्यनाथ काॅलेजची 12 वी बोर्ड निकालाची उज्वल यशाची परंपरा कायमकु.प्रेरणा बदने,कु.प्रगती गित्ते,चि.पंकेश कसबे व चि.मिलिंद कसबे प्रथम
परळी वै.(प्रतिनिधी) -: येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी फेब्रु./ मार्च 2020 मध्ये झालेल्या 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन त्यांनी गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेतुन कु.प्रेरणा राम बदने (83.53) , चि.हर्ष जगदीश लड्डा (81.07) व कु.मदिना तैकुदिन शेख (80.46) हे अनुुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत. वाणिज्य शाखेतुन कु.प्रगती विष्णु गित्ते (85.53),चि.रामेश्वर राजाभाउ पवार (79.38) व कु.सेजल गोपाल मंत्री (77.23) हे अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत. कला शाखेतुन चि.पंकेश विश्वंभर कसबे (81.23), चि.ओमकार रोहिदास मुंडे (77.69) व कु.राधा हरिभाउ गुंडाळे (77.53) हे अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले असून व्यवसायीक अभ्यासक्रम विभागातुन चि.शेख इमरान मोबीन (73.84) , चि.रोहन राजेश लटिंगे (70.46) तर चि.मिलिंद सुरेश कसबे (66.61) हे अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत. विज्ञान शाखेचा एकुण निकाल (97.49) , वाणिज्य शाखेचा (86.15),कला शाखेचा (66.41) तर व्यवसायीक अभ्यासक्रम विभागाचा (60.00) इतका लागला आहे.विशेष म्हणजे कु.प्रगती विष्णु गित्ते या 12 वी वाणिज्य वर्गात प्रथम येणा-या विद्यार्थीनीने संकृत विषयात 100 पैकी 100 गुण संपादित केले आहेत.
वरील सर्व गुणवंत विद्याथ्र्यांचे जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.जुगलकिशोरजी लोहिया, उपाध्यक्ष श्री.फुलचंदराव कराड, डाॅ.दे.घ.मुंडे,सचिव श्री.दत्ताप्पा इटके, कोषाध्यक्ष श्री.सुरेशकुमार अग्रवाल, सहसचिव डाॅ.सुरेशचंद्र चैधरी, श्री.विजयजी वाकेकर,प्राचार्य डाॅ.आर.के.इप्पर, उपप्राचार्य सर्वश्री प्रा.एस.एम.सुर्यवंशी, डाॅ.व्ही.जे.चव्हाण व डाॅ.जे.व्ही.जगतकर पर्यवेक्षक प्रा.डाॅ.एस.आर.सुर्यवंशी व प्राध्यापकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment