परळीकरांना धक्यावर धक्के!आज पुन्हा 4 पाॕझिटिव्ह वाढले
परळी (प्रतिनिधी) -: परळीतील एसबीआय च्या संपर्कात आलेल्या जवळपास 1500 कोरोना संशयित नागरिकांच्या तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने घेण्यात आल्या होत्या. सलग दोन दिवस त्यांच्या प्रक्रिया सुरू होती.यामध्ये जवळपास861 नागरिकांचे स्वॕब घेण्यात आले होते.त्यापैकी 340 जणांचा रिपोर्ट प्राप्त झाला असुन नव्याने 4 कोरोनाग्रस्त नागरिक आढळुन आले आहेत.521 व्यक्तीचा स्वॕबचा रिपोर्ट येणे बाकी आहेत.
आजच्या रिपोर्ट नुसार परळीशहरातील विद्या नगर येथील 39वर्षे पुरुष,इंदिरानगर येथील 75 वर्षीय पुरुष,न्यु पेठ मोहल्ला 44 वर्षे पुरुष, आणि तालुक्यातील ब्रह्मवाडी गावातील 25 वर्षीय पुरुष हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत यामुळे कोरोनाने शहरात आता पाय पसरायला सुरुवात केलीय घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Comments
Post a Comment