43 वर्षीय महिलेवर 14 दिवस डांबुन नराधमाचा बलात्कार.
परळी (प्रतिनिधी) -: परळी शहर पोलीस स्टेशनच्या डायरीत मिसिंगची नोंद असलेल्या शहरातील एका 43 वर्षीय विवाहित महिलेस 14दिवस एका घरात
डांबुन एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली असुन पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी त्या लिंगपिसाटाविरूध्द काल दि.7जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे.
शहरात घडलेल्या या मन सुन्न करणाऱ्या घटनेची सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की परळी पोलीस स्टेशनच्या डायरीत मिसिंग म्हणुन नोंद असलेल्या एका 43 वर्षीय विवाहित महिलेने आपले अपहरण करून एका घरात तब्बल 14दिवस डांबुन ठेवुन एकाने बलाक्तार केल्याची शहर पोलीस स्टेशनला फिर्याद काल दि.7जुलै रोजी 21:33वाजता दिली फिर्यादीत पिडीत महिलेने आरोपी शादाब खान रा.बंगला मोहल्ला परळी यांने आपणाला 14दिवस घरात डांबुन बलाक्तार केला व सहा ग्रँम सोन्याची अंगठी काढुन घेतली मी कसे बसे
त्याच्या तावडीतुन सुटका करून घेतली असा आरोप केला आहे. महिलेच्या फिर्यादी वरून पोलीसांनी आरोपी शादाब खान विरूध्द गु.र.नं.208-20 कलम 376,365 व 386 भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी फरार असुन पुढील तपास स.पो.नि.आरती जाधव या करीत आहेत.
Comments
Post a Comment