राजगृह हल्ला प्रकरण 48 तासाच्या आत आरोपींना अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू बीड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर घटनेतील समाजकंटकांना कडक शासन करा- ज्येष्ठ नेते वं.ब.आ.अशोक हिंगे,बबन वडमारे



बीड (प्रतिनिधी) -: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर दि.07 रोजी  संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.या घटनेचा जाहिर निषेध वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक हिंगे, बबन वडमारे व आंबेडकरी विचारधारेचा व परिवर्तनवादी विचारधारेच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे, या घटनेचा आंबेडकरी जनतेमध्ये संताप होता, तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात होती पण बीड जिल्ह्याचे प्रशासन तुम्ही निवेदन द्या आम्ही तुमच्या तीव्र भावना प्रशासनाला शासनाला कळवू असे सांगितले व जनतेला शांत राहण्याचे आवाहन महाराष्ट्र करण्यात आले  वंचित बहुजन आघाडी बीड  जिल्हाधिकारी राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूस 24 तासाच्या अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे ज्या ठिकाणी आज तोडफोड करण्यात आली.या घटनेने तमाम फुले-शाहु-आंबेडकर चळवळीच्या भावनेला ठेच पोहचली आहे.
आमचे श्रद्धास्थान असलेल्या राजगृहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटक भडव्यांना कडक शासन झालेच पाहिजे आशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अशोक हिंगे,बबन वडमारे, शेख युनुस, ज्ञानेश्वर कवठेकर अजय सरवदे, लखन जोगदंड, संदीप जाधव यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला