परळीतून काल पाठवलेल्या 50 पैकी 1 जण पाॕझिटिव्हआज पुन्हा नव्याने 38 स्वॕब


परळी (प्रतिनिधी) -: शहरातील स्टेट बॕक आॕफ इंडियाच्या पाच कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने त्यांच्या संपर्कात आलेले व इतर व्यक्ती असे एकुण 50 स्वॕब परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाने घेतले होते.त्या 50 व्यक्तीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन 50 पैकी स्टेट बॕक आॕफ इंडियाच्या शाखेतीलच 1 जण पाॕझिटिव्ह आला आहे.एकुण शहरात 6 कोरोना पाॕझिटिव्हचा आकडा झाला आहे.आज पुन्हा नव्याने 38 संशयीत व्यक्तींचे स्वॕब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.परळीसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

परळी तालुक्यातील कोरोना बाधिंतांच्या आकडा आता एकुण 9 झाला आहे. यापैकी 6 व्यक्ती कोरोनावर उपचार घेत आहेत तर 3 जणांनी यापुर्वीच कोरोनावर मात केली आहे.
परळीकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काळजी घेतली गेली पाहिजेत.

उपजिल्हा रुग्णालय परळी वै.
दि.05/07/2020

आज घेतलेले स्वॕब….38

काल पाठवलेले सॕब….50
निगेटिव्ह……49
पाॕझिटिव्ह….01
प्रलंबित……00

आज पर्यत पाठवलेले एकुण स्वॕब 308

निगेटिव्ह ….299
पाॕझिटिव्ह ….09 (कोरोना अक्टीव-6, कोरोना मुक्त-3)
प्रलंबित …… 00                         

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आधार प्रमाणीकरण तक्रार निवारणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन