ऑटो रिक्षा चालकांना प्रतिमहिना 7,500 देण्यात यावा - संतोष निकाळजे बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसची कमिटीची मागणी.


बीड (प्रतिनिधी) दि.28 - लाॅकडाऊन मुळे संपूर्ण मानवजातीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, या कालावधी मध्ये अनेक उद्योगधंदे तसेच हातावर पोट असणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांना उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना शासनाने 7,500 रुपये प्रति महिना मानधन देऊन अर्थसहाय्य करावे अशी व इतर मागण्यांचे निवेदन बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष संतोष निकाळजे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले आहे.

कोरोणा च्या जागतिक महामारी मुळे सर्वजन भरडले गेले आहेत त्यामध्ये ऑटो रिक्षाचालक-मालक यांच्या वर खूप वाईट दिवस आले आहेत, रोजीरोटी व रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील असंघटित कामगार काँग्रेस कमिटीच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांना आरटीओ द्वारा आकारण्यात येणारे शुल्क नूतनीकरण, प्रवासी वाहतूक, वाहन नोंदणी शुल्क, या शुल्का मध्ये एक वर्ष माफ करण्यात यावे, ऑटोरिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पुढील सहा महिन्यापर्यंत वसूल करण्यात येऊ नये, व त्यावरील व्याज माफ करण्यात यावी असे निर्देश सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना व फायनान्स कंपनीने देण्यात यावेत ऑटोरिक्षा चालक मालकांसाठी इतर कल्याणकारी महामंडळा सारखे महामंडळ स्थापन करण्यात यावे, ऑटो रिक्षा चालक मालक यांना न्याय योजने  अंतर्भूत करून सात हजार पाचशे रुपये प्रति महिना लागू करण्यासाठी राज्य शासनाने करावी, ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ठरवण्यासाठी सरकारी नियंत्रण हटविण्यात आल्यावर पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे तेलाच्या भावानुसार प्रवासी वाहतूक भाडे व दर निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासना मध्ये समिती गठन करावी, आर्थिक विवंचनेतून महाराष्ट्र राज्यात 9 ऑटो चालक यांनी आत्महत्या केली आहे यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाने प्रतिव्यक्ती दहा लाख रुपये अर्थसाह्य देऊन मदत करावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या सर्व मागण्यांचा महाराष्ट्र शासनाने सहानुभूती पूर्वक विचार करावा असं संतोष निकाळजे बीड असंघटित कामगारांचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व बीड येथील पदाधिकारी प्रशांत निर्मळ ,असलम खान पठाण, नामदेव घुगे,जालिंदर करडकर, गणेश शेळके,प्रमोद चक्रे आदी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर