कु .प्रेरणा बदणे 84% टक्के गुण घेऊन बारावी परिक्षेत घवघवीत यश.
परळी (प्रतिनिधी) -: जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. प्रेरणा राम बदणे इयत्ता बारावी सायस शाखेमधुन 84%टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
कु. प्रेरणा राम बदणे हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजनाथ मधुन विशेष प्रविण्य मिळवून ऊतीर्ण झाली आहे. तसेच कु. प्रेरणा राम बदणे सायस शाखेतून 650 पैकी 543 गुण घेऊन 84%टक्के घेऊन ऊतीर्ण झाली आहे. रात्रंदिवस केलेली मेहनत आणि शिक्षक वृदांवन मिळालेले मार्गदर्शन यामुळे आपण यश संपादन केल्याचे तीने सांगितले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आई वडील मित्रपरिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
Comments
Post a Comment