साक्षी सुभाष वीर हिने बारावी परीक्षेत 89%टक्के गुण
बीड (प्रतिनिधी) -: लॉकडाऊन च्या काळात बारावीचे निकाल खूप उशिरा त्यामुळे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत निकाल लागला आहे, त्यामध्ये बीडची असलेली परंतु लातूरला शिक्षण घेत असलेली कु. साक्षी सुभाष वीर हिने बारावी विज्ञान परीक्षेत 89% टक्के गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे,
घरातील शैक्षणिक वातावरण वडील शिक्षक असल्या मुळे योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची सुनियोजित नियोजन आणि लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आदर्श घ्यावा लागेल अशा पद्धतीने अभ्यास करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे, आई-वडिलांचे मार्गदर्शन व गुरुजनांचे मार्गदर्शन व स्वतःच्या मेहनतीवर हे यश प्राप्त केले आहे.
बारावी विज्ञान परीक्षेत घवघवीत यश तिने राजर्षी शाहू महाविघ्यालय लातूर येथे बारावी विज्ञान परीक्षेत 89% टक्के गुण घेवून मिळवले, ती बीड शहरालगत असलेल्या पाली येथील ग्रामीण भागातील विध्यार्थीनी आहे. लातूर येथील शाहू महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व नातेवाईक यांच्याकडून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment