बोरी सावरगाव परिसरात आढळला दुर्मिळ जनुकीय बदल असणारा BANDED RACER जातीचा साप


अंबाजोगाई (प्रतिनिधी) -: तालुक्यातील बोरी सावरगाव परिसरामध्ये आज दि 24 जुलै सकाळच्या सुमारास एका दुर्मिळ जनुकीय बदल घडून आलेला BANDED RACER (धूळ नागीन) प्रजातीचा पांढऱ्या रंगाचा साप आढळून आला असता सदरील घटनेची माहिती मिळताच बनसारोळा येथील सर्प अभ्यासक तथा सर्पमित्र सुधाकर तट व त्यांच्या साथीदारांनी सदरील सापास रेस्क्यू करून निसर्ग मुक्त केले आहे.

    याबाबत प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील कळंब रोड वरती असणाऱ्या बोरी सावरगाव परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला गजबजलेल्या ठिकाणी आज दि 24 जुलै सकाळच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाचा अतिशय दुर्मिळ साप येथील नागरिकांच्या निदर्शनास आला सदरील घटनेची माहिती नागरिकांनी फोनवरून बनसारोळा येथील सर्प अभ्यासक तथा सर्पमित्र सुधाकर तट यांना दिली असता त्यांनी वेळ न दवडता भाऊराव जोगदंड व तुकाराम पांचाळ या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचत सदरील दुर्मिळ असणाऱ्या व जनुकीय बदल घडून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या सापास पकडून त्याला निसर्ग मुक्त करत जीवनदान दिले.

    या सापाबद्दल अधिक माहिती देताना सर्प अभ्यासक श्री सुधाकर तट यांनी सांगितले की सदरील साप हा बिनविषारी असून धूळ नागीन (BANDED RACER) या प्रजातीचा आहे मात्र याला अल्बिनो म्हणजेच एक प्रकारचा जनुकीय आजार असल्याने या प्रजातीमध्ये नैसर्गिक धवलता आढळून येते या जनुकीय बदलांमुळे हा साप दुर्मिळ प्रकारांमध्ये मोडतो व या परिसरात असा अतिशय दुर्मिळ प्रकारचा साप आढळणे ही बहुधा पहिलीच घटना आहे अल्बिनो हा जनुकीय आजार याला जडला असला तरी यामुळे या सापाच्या जीवितास कुठलाही धोका उद्भवत नसून हा केवळ एक नैसर्गिक बदल असल्याचेही यावेळी सर्पमित्र श्री तट यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला