फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे नेते सोपान ताटे यांचा वाढदिवसानिमित्त पोटभरे व मुंडे यांच्याकडून सत्कार
परळी (प्रतिनिधी) -: फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे नेते सोपान ताटे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त दि.०१ जुलै रोजी शंकर साळवे यांच्या निवास स्थानी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे व जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दत्ता सावंत, अनंत इंगळे, रवी मुळे, केशव गायकवाड, पंचायत समिती सदस्य मुरलीधर साळवे व श्रीहरी मोरे, फुले आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे,युवा नेते बापू गायकवाड, अमर रोडे, किशोर चोपडे, श्यामसुंदर दासूद, सोपान रोडे, स्वप्नील साळवे, राजन वाघमारे आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment