मिलिंद शाळेचा निकाल ९१.६६ %


परळी वै .(प्रतिनिधी) -: दि.२९ जुलै २०२० रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० चा निकाल घोषित करण्यात आला. प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी प्रज्ञा एज्युकेशन सोसायटी संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल ९१.६६ % लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह १७ विद्यार्थींनी उत्तीर्ण झाले. तसेच प्रथम श्रेणीतून २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  शाळेतून एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते, त्यांपैकी एकूण ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेतून सर्व प्रथम कु. यशश्री सिद्धेश्वर रनखांबे ९३.६० गुण घेवून प्रथम आली आहे. द्वितीय कु. वैष्णवी परशुराम गित्ते ९१.२० तर शाळेतून तृतीय येण्याचा मान कु. विशाखा विश्वास रोडे या विद्यार्थीनीस मिळाला.

विशेष प्राविण्यासह ९६ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
सय्यद उमर अहेमद ताज मोहम्मद ८६.८०, श्रेयस संजय शेप ८६.२०, अंजली सुभाष कसबे ८५.६०, रोहीनी नवनाथ तांदळे ८५.२०, आकांक्षा युवराज जगतकर ८३ , प्रेरणा संजय जोगदंड ८२.२० , प्रियंका महादेव घोडके ८१.४० या विद्यार्थ्यांनी ८० % पेक्षा अधिक गुण मिळवले. 
 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेने उत्कृष्ठ निकालाची परपंरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अॅड.अनंतरावजी जगतकर साहेब यांनी विद्यार्थी, पालक व शाळेतील  सर्व शिक्षकवृदांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांना पुढिल शैक्षणिक वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवार के.एन., पर्यवेक्षक श्री.कोम्मावार आर.जी. शाळेतील सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शौक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर