सरूबाई शिवाप्पा नावंदे यांचे निधन अशोक नावंदे यांना मातृशोक


परळी (प्रतिनिधी) -: श्रीमती सरूबाई शिवाप्पा नावंदे रा.परचुंडी ता.परळी वैजनाथ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 100 वर्षाच्या होत्या. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या मातोश्री होत.
परचुंडी येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सरूबाई नावंदे यांचे शनिवार दि.25 जुलै रोजी निधन झाले. रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर परचुंडी ता.परळी वैजनाथ येथे अंत्यविधी होणार आहेत. त्या 100 वर्षाच्या होत्या. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. संस्कारशिल कुटूंबाचा त्या आधारवड होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. औरंगाबाद येथील प्रसिद्ध प्रेस छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांच्या त्या काकु होत.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर