नियमित वेतनश्रेणी मध्ये घेण्यात यावे - बीड इंटकची मागणी.तात्पुरती समय श्रेणी नको - बबन वडमारे
बीड (प्रतिनिधी) दि.11-: तात्पुरती समय श्रेणी नको तर नियमित वेतन श्रेणी पाहिजे या मागणीचे निवेदन बीड विभाग नियंत्रक साहेब यांना सादर करण्यात आले चालक वाहक सहाय्यक व सहाय्यक व इतर कामगार कर्मचारी यांना (टी एस ) तात्पुरत्या समय श्रेणी मध्ये घेण्यात यावे यासाठी निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बीड विभागाचे चालक वाहक सहायक व इतर कामगार कर्मचारी तात्पुरती समय श्रेणी म्हणून दहा वर्षा पासून बीड विभागां मध्ये कर्तव्य बजावत आहेत परंतु आज पर्यंत त्यांना नियमित वेतनश्रेणी घेतले गेले नाही, टी एस चालक-वाहकांना कर्तव्ये देत असताना टी टी एस कामगार म्हणून त्यांच्यावर सतत अन्याय होतो या सर्व बाबीचा विचार करून माननीय साहेबांनी टी टी एस कामगारांना नियमित वेतनश्रेणी वर घेऊन त्यांच्या वर होत असलेल्या अन्याय दूर करावा अशा मागणीचे निवेदन बीड विभाग नियंत्रक मार्फत महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापकीय संचालक राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन मुंबई सेंट्रल मुंबई यांना देण्यात आले. यामध्ये बबन वडमारे, गोकुळ जगताप पाटील, श्याम नागरगोजे, शिराज पठाण, श्रीकांत येडे, दिगंबर आनेराव, शेख अजिज, संजय डोळस, अनुराधा रसाळ, किरण पठाडे, मीरा काळे, सीमा कांबळे,मंदा तांदळे, प्रभावती हावळे मीनाक्षी परजणे सह महिला निवेदनावर सह्या आहेत, चालक-वाहक सहाय्यक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment