राजगृहावर हल्ला चढवणा-या हल्लेखोराला अटक करा अन्यथा बहुजन समाज रस्त्यावर उतरेल-वैजनाथ जगतकर
परळी (प्रतिनिधी) -: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 'राजगृहा'वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली. हा हल्ला म्हणजे आमच्या अस्मितेवरा घाला आहे .यातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन कडक शिक्षा करावी अन्यथा फुले-शाहु-आंबेडकर ,बहुजन समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा परळी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जेष्ठनेते वैजनाथ जगतकर यांनी सरकारला दिला आहे.
राजगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. हे ठिकाण म्हणजे आमच्या साठी ऊर्जा चे ठिकाण आहे.अज्ञात समाजद्रोही कडुन हल्ल्याचे कृत्य केले याचा जाहिर निषेध करतो व राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंञी यांनी या समाजद्रोह्याला त्वरित अटक करुन कडक शिक्षा करावी अन्यथा या हल्ल्यामुळे संतप्त झालेला बहुजन समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा परळीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जेष्ठनेते वैजनाथ जगतकर यांनी सरकारला दिला आहे.
Comments
Post a Comment