ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार सोनार लाईन येथील रस्त्याची नगर परीषदे मार्फत तात्काळ दुरूस्ती-चेतन सौंदळे


परळी (प्रतिनिधी) -: बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार मोंढा भागातील महाराष्ट्र शु मार्ट समोरील सोनार लाईन भागातील रस्त्याची नगर परीषदे मार्फत शनिवार दि.4 जुलै रोजी तात्काळ रस्ता दुरूस्ती करून सोनार लाईन भागातील व्यापारी व नागरिकांची गैरसोय दुर करण्यात आली.
ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे व न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या निर्देशानुसार मुख्याधिकारी अरविंद मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,स्वच्छता सभापती किशोर पारधे,  नगरसेवक चेतन सौंदळे, नगर अभियंता श्री.बेंडले व नगर परीषद कर्मचा-यांनी अख्तरी मस्जिद,राणी लक्ष्मीबाई टॉवर,सोनार लाईन व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भागांची  पावसाळयात निर्माण होणा-या नागरिकांच्या गैरसोयीची पाहणी करून नगर परीषद प्रशासनास याभागातील गैरसोयी दुर करण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार नगरसेवक चंदूलालजी बियाणी,चेतन सौंदळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन सोनार लाईन भागातील रस्त्याची दुरूस्ती नगर परीषदे मार्फत करण्यात आली.
यावेळी नगरसेवक चंदूलालजी बियाणी, चेतन सौंदळे, पप्पू पाटसकर, देवेन्द्र कासार, शेख शम्मो, गिरीष भोसले, चंद्रकांत शिंदे, नमेश जाजू, मनोज मानधणे, गजानन हालगे, रमेश डहाळे, संदीप टेहरे तसेच व्यापारी बांधव व नागरिकांची उपस्थिती होती. सदरील रस्ता दुरूस्तीबद्दल ना.धनंजय मुंडे व नगर परीषदेचे आभार व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केले आहेत.

चौकट
बीड जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार राणी लक्ष्मीबाई टॉवर,अख्तरी मस्जिद,कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच ईतर भागातील पावसामुळे निर्माण होणारी गैरसोय नगर परीषदे मार्फत दुर केली जाईल.
       चेतन सौंदळे
नगर सेवक,न.प.परळी

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला