आरंभ भक्तीचा
आरंभ भक्तीचा
भक्ती या शब्दात संपूर्ण जग सामावले आहे. अतिशय अवघड पण परिपूर्ण शब्द आहे. भक्ती म्हणजे जुडणे त्या ईश्वराशी जुडणे अनुभव करणे म्हणजे भक्ती होय. त्याचबरोबर धर्म या शब्दाचा अर्थ आहे धारण करणे. शास्त्रानुसार जो भक्त आहे, जो भक्ती करतो किंवा स्वत:ला भक्त समजतो. याचा अर्थ तो ईश्वराची जुडलेला आहे. या भक्तामध्ये दया, क्षमा, शांती, अक्रोध, परोपकार, पवित्रता, संयम, अस्तेय व उत्तमविद्या या दहा गुणांचा समावेश असतो. त्यावेळी तो भक्त परिपक्व धार्मिक भक्त असे शास्त्र संागते.
आता प्रश्न असा आहे की, आम्ही स्वत:ला धार्मिक भक्त म्हणवून घेतो तर काय वरील दहा गुणांपैकी पाच गण तरी आमच्या अंगी आहेत का ? असतील तर आम्ही स्वत:ला धार्मिक किंवा भक्त मानु शकतो अन्यथा नाही. वरीलपैकी सर्वचे सर्व दहा गुण एका पूर्ण संतात असतात. आम्ही स्वत:ला भक्त म्हणवून घेतोेत तर काय त्या ईश्वराशी आम्ही जुडलो आहोत का ? धर्म म्हणजे त्या ईश्वरास आम्ही धारण केले आहे का ? त्या ईश्वरास स्वत:मध्ये जाणणे म्हणजेच त्याचा साक्षातकार करणे म्हणजेच भक्ती होय. नसता सध्याच्या कलयुगात कपाळाला गंध लावणे, पुजापाठ करणे, पारायण करणे, किर्तन, भजन करणे, जप करणे, यालाच भक्ती समजण्याची प्रथा आहे असे संसार मानतो. परंतू शास्त्र, धार्मिक ग्रंथ याला भक्ती मानत नाहीत. वरील दहा गुण अंगी असणे व त्या ईश्वराचा साक्षात्कार करणे यालाच शास्त्र भक्ती मानते.
मग वरील सर्व गुण आपणात येतील कसे त्यासाठी ईश्वरास जाणणे (पाहणे/साक्षात्कार करणे) आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठात शेवटी एक ओवी लिहिली, ती म्हणजे ।। एक तरी ओवी अनुभवावी ।। न की वाचावी, लिहावी, पाठांतर करावी, ज्ञानेश्वरांनी हरिपाठाच्या आरंभीच विठ्ठलाचा ठाव ठिकाणा सांगतला. ।। काया ही पंढरी ।। आत्मा हा विठ्ठल ।। विठ्ठल कोठे बाहेर नाही तर तो या देहातच सामावला आहे. त्याची ओळख करून घेणे म्हणजेच भक्ती होय. आपणास खरा भक्त बनावयाचे असेल तर त्या आत्मारूपी विठ्ठलास शरीरातच जाणणे । पाहणे आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही भौतिक साधनांची गरजच नाही. आपण विठ्ठलाचा साक्षात्कार जो पर्यंत करत नाही तो पर्यंत आपली भक्तीच सुरू होत नाही व त्याचा साक्षात्कार करण्यासाठी एका पूर्ण संतांची । पूर्ण गुरूची आवश्यकता असते. जो संत माझ्यातील आत्मारूपी विठ्ठलाचे दर्शन मला तात्क्षण घडवून देईल. असा गुरू जीवनात आल्यानंतरच त्या ईश्वराचे दर्शन होते व तेथून पुढे आपली भक्तीचा आरंभ होतो.
मग प्रश्न पडतो की, हरिपाठ वाचणे, पारायण करणे, देवाला जाणे, मला जपणे, देवाचे नाव घेणे, गंध लावणे ही भक्ती नाही का ? तर ज्ञानेश्वर महाराज या सर्व विधीस भक्ती मानत नाहीत. यासाठीच त्यांनी हरिपाठात एक ओवी लिहिली ।। योग, याग विधी ।। येणे नोके सिद्धी ।। वायाची उपाधी दंभ धर्म ।। कोणतीही विधी, यज्ञ, योग त्या ईश्वराचे दर्शन घडवून देउ शकत नाही या सर्व कर्म कांडातून अहंकारच येतो असे ते सांगतात.
ज्ञानेश्वरांनी त्या ईश्वराचे एकच नाव आहे असे सांगितले. त्या नामाशिवाय इतर नावाने त्यास जानता येत नाही. यासाठी त्यांनी ओवी लिहिली. ।। एक नाम हरी ।। दैत नाम दुरी ।। अद्वैत कुतळी वीरला जाण ।। याचा अर्थ असे कुणीतरी एखादाच भक्त असतो की, जो माझ्या खऱ्या शाश्वत नामास जाणतो. याचा अर्थ त्या विठ्ठलाचे नाव ऊँ नाही, राम नाही, कृष्ण नाही, हरी नाही, पांडूरंग नाही त्या ईश्वराचे नाम तुमच्याच श्वासात आहे. ते पूर्ण सदगुरू जाणवून देतात. त्याचवेळी तुम्हाला त्या नामाची अनुभूती होते. नंतर मुखाने नाम घेण्याची गरजच नाही. हे नाम शब्दाच्या परे आहे शब्दातील असल्याने ते जाणता येते. लिहिता, वाचता येत नाही.
यामुळे त्यांनी आणखी एक ओवी लिहिली ती म्हणजे ।। जप मौन माळ अंतरी ।। धरोणी श्रीहरी जपे सदा ।। याचा अर्थ न ओठ हलवता त्या नामाचा जप आपल्या श्वास रूपी माळेवर करावयाचा आहे. पिशवीच्या अंतरी माळ जपा असे ज्ञानेश्वरांनी सांगितले नाही. ही श्वासरूपी माळ जपावयाची हे एक पूर्ण सदगुरू आपणास शिकवतात.
ज्यावेळी या देहातच त्याची अनुभूती व शाश्वत नामाची ओळख आपणास होते त्यावेळी वरील दहा गुणांपैकी काही गुण आपणास प्रकट होतात व त्या विठ्ठलास आपणास कोठे शोधावयाची गरज राहत नाही. तो विठ्ठल सर्व व्याप्त आहे. तो विठ्ठल ज्योतीची निज ज्योती असून आत्मारूपाने आपल्यात वास करते त्या ज्योतीचा साक्षात्कार करणे म्हणजेच त्याचा साक्षात्कार करणे होय.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे शाश्वत भक्ती करण्यासाठी एक पूर्ण संताच्या शरणी पूर्ण भक्तीभावाने शरण जावे व त्या ईश्वराची अनुभूती करून घ्यावी जेणे करून आपणास विठ्ठलाच्या दर्शनासाठी फिरवयाची गरजच नाही तो सर्व सृष्टीत भरून उरला आहे.
।। अखण्ड मन्डलाकारम । व्यातयणे चराचरम ।।
तत्पदम दशृतम येणे, तस्मै श्री गुरूवे:नमा:।।
या सृष्टीत तो ईश्वर पूर्ण भरला आहे. त्या ईश्वराचा जो अनुभव करून देईल त्या संतास पूर्ण गुरू समजा असा याचा अर्थ होतो. असा गुरू ज्या दिवशी जीवनात येईल त्यावेळी पासून आपण स्वत:ला भक्त म्हणवून घेउ शकतो.
संतोष जुजगर
परळी वैजनाथ जि.बीड
Comments
Post a Comment