जनतेच्या आरोग्यासाठी न.प. प्रशासनाने सॅनिटायझर ने फवारणी करावी―प्रा.टी. पी.मुंडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
परळी (प्रतिनिधी) -: परळीत गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अक्षरशः थैमान घातले आहे त्यातच एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली व त्यांच्या संपर्कात जवळपास दीड हजार लोक सापडले असे एकंदरीत असताना याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर परळी शहरात होत आहे परळी शहरातील प्रत्येक विभागातून कोरोना चे रुग्ण सापडत आहे त्यामुळे परळी मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे त्याच बरोबर शहर स्वच्छ ठेवणे हे नगरपालिकेची नैतिक जबाबदारी असून परळीतील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी लक्ष देऊन गल्ली व वॉर्डांमध्ये स्वच्छता व सॅनिटायझरने फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी न.प.चे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी शहरातील प्रत्येक गल्ली व वाडा मध्ये दोन दिवसा आड स्वच्छता आणि सॅनिटायझर ने फवारणी करावी. नागरिकांच्या आरोग्याची मुख्याधिकारी व दाधिकार्यांनी खेळू नये तसेच मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून आरोग्यविषयक उपाय योजना राबवाव्यात तसेच परळी शहरात संचारबंदी असल्याकारणाने परळीतील व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला आहे त्यातच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे रासायनिक खते व औषधे संचार बंदी मुळे मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गाचे हाल होत आहेत त्यासाठी परळी शहर उघडे राहणे गरजेचे आहे. यासाठी परळी न.प.ने मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे.
अनेक सर्वसामान्य लोकांचे फोन येत असल्यामुळे व आपणही जनतेला या कठीण संकटात साथ दिली पाहिजे त्याच बरोबर खासगी दवाखान्यांमध्ये काम करणारे सर्व वार्ड बॉय ,नर्स, व इतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी सरकारी आरोग्य यंत्रणेद्वारे करावी अशीही मागणी त्यांनी केली गेल्या पाच महिन्यापासून हे कर्मचारी आपल्या स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा देत आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आरोग्य जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे त्याच प्रमाणे पोलीस दलातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, व नगरपालिकेतील कर्मचारी हे गेल्या पाच महिन्यापासून आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा देत आहेत त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानून त्यांच्या आरोग्याची प्रार्थना केली तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड ,पोलीस अधीक्षक बीड ,जिल्हा चिकित्सक बीड ,उपजिल्हाधिकारी व तहसीलदार परळी यांना देण्यात आल्या आहेत तसेच परळी व परिसरातील नागरिकांनी शासकीय नियम पाळावेत, कामाशिवाय घराबाहेर पडू नये व आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशी विनंती ही त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment