उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी घोषणेला केला प्रतिबंध : "जय भवानी- जय शिवाजी" घोषणेची ११हजार पत्रं परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पाठविणार-बाजीराव धर्माधिकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवणार पत्र


परळी वै. (प्रतिनिधी) -: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी नविन राज्यसभा सदस्यांना सभागृहात शपथ घेतल्यानंतर देण्यात आलेल्या जय भवानी जय शिवाजी घोषणेला  प्रतिबंध केला.याचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना "जय भवानी जय शिवाजी" लिहिलेली ११हजार  पत्रं परळीतून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पाठविणार असल्याचे परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.
      राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्य यांनी शपथ घेतली व त्यानंतर जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली.नेमके या घोषणेने तिळपापड झालेल्या व छत्रपतींच्या विषयी प्रेमाचा दिखाऊपणा करणार्या भाजपाच्या व्यंकय्या नायडूंनी  " हे माझे चेंबर आहे . इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळी लक्षात ठेवा" असे सुनावले. भाजपची छत्रपतींच्या बद्दल असलेली खोटी भावना यातून स्पष्ट दिसली. निवडणूक आली की  'छत्रपतींचा आशिर्वाद' म्हणत केवळ मतांसाठी छत्रपतींच्या विषयी बेगडी प्रेम भाजप दाखवते.परंतु या घटनेनंतर भाजपाच्या बेगडीपणाचा बुरखा टरटरा फाटला आहे. या पार्श्वभुमीवर छत्रपतींच्या विषयी असलेल्या लाखोंच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून व भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना जाणीव करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना "जय भवानी जय शिवाजी" लिहिलेली ११हजार पत्रं राष्ट्रवादी काँग्रेस पाठविणार असल्याचे परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला