राजा ढाले :आक्रमक पॅथर.
राजकीय जाण असलेला सामाजिक कार्यकर्ता राजाराम पिराजी ढाले यांचा जन्म ३० सप्टेंबर १९४० रोजी झाला होता. राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील एक जेष्ठ नेते उच्च राजकारणी,समिक्षक, त्याचप्रमाणे बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक होते प्रबुद्ध भारत या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राक्षिकात देखील त्यांचे लिखाण दिसून येते. १९७० नंतर चा प्रस्थापित साहित्या विरोधात दलित साहित्य उद्यास आले त्यात बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ,ज.वि.पवार त्याचप्रमाणे राजाभाऊ ढाले अदिनी मोलाचे अमुलाग्र लिखाण करूंन दलित साहित्याची पाया भरणी केली.
१९७० नंतर महाराष्ट्रात दलित समाजावरील न्याय अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसुन येते या दलित असंतोषाचे नाव होते 'दलित पॅथर' या चळवळीची स्थापना ९ जुलै १९७२ रोजी झाली. दलित पॅथर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील समजाबदलचा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. व्यवस्थेला उत्तरे देण्यासाठी मजबुर करणारा संघर्ष म्हणजे दलित पॅथर होय. या पॅथर ने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चांगलाच दरारा निर्माण केला. हजारों नवतरुण या पॅथर भोवती जमा झाले. दलित पॅथर म्हणजे एक प्रकार ची नवक्रांती व दलितांचा मुक्तीलढा होता या पॅथर चा लाखों सभा महाराष्ट्र मध्ये होत होत्या महाराष्ट्रातील खेढ्यापाढ्यात देखील पॅथर चळवळ व्यापली होती हे दिसुन येते.
तत्कालीन कालखंडात शिवसेनालाही या दलित पॅथर ने आव्हाण दिले होते. दलित पॅथर मध्ये नामदेव ढसाळ,भाई सिंगारे,राजा ढाले,ज.वि.पवार,त्यानंतर गंगाधर गाढ़े,जोंगेद्र कवाड़े, प्रितमकुमार शेगावकर,रामदास आठवले हे सामिल होते. पॅथर चा स्थापनेपासुनच राजाभाऊ हे आक्रमक भुमिकेसाठी चर्चेत होते राजाभाऊ चे दलितांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर बारीक लक्ष असायचे.
नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा या कविता सग्रहाचा प्रकाशन सोहळा होता प्रमुख वक्त्या होत्या दुर्गा भागवत ढसाळ यांच्या कवितेवर दुर्गाबाई नी आसुड ओढले आणि तिथल्या तिथे उत्तर देण्यासाठी राजाभाउ उठले त्यांनी दुर्गाबाई खुप समाचार घेतला त्याचा घोर अपमान झाला त्या रडावेल्या होत्या सन १९७२ साली भारतीय स्वातंत्र्यांचा रोप्यमहोत्सवी वर्ष होते. तेव्हा राजाभाऊ म्हणाले 'देशातल्या दगड धोढ्यांना नदी नाल्यांना आणि वर्चस्व वादाला स्वातंत्र्य मिळाले असेल परंतु आम्हा दलिता पर्यत हे स्वातंत्र्य पोहचलेच नाही पाझरलेच नाही. असा युक्तीवाद केला होता.
९ जुलै १९७२ दलित पॅथर चा मेळाव्यात त्यांनी असे ठरविले की या वर्षीचा स्वातंत्र्य दिन आपण काळा स्वातंत्र्यदिन म्हणुन पाळू आणि तो सर्वानि मान्यदेखील केला साधना या विशेषकांत राजाभाऊ नी 'काळा स्वातंत्र्य दिन' हां लेख लिहला सदरील लेख भारतीय समाज व्यवस्था व सरकारला बॉबस्फोटा सारखा ठरला.
राजा ढाले लघुअनियत कालिकांच्या अग्रभागी होते त्यांनी साहित्य क्षेत्रात नविन प्रयोग घडवुन आणले फुले_शाहू_आंबेडकर या विषयांचा दांडगा अभ्यास राजाभाऊना होता.
दलित चळवळीस लागलेल्या दुहिचा शाप दलित पॅथरला पण बसला आंबेडकरवाद का मार्क्सवाद यामुळे पॅथर फुटली नागपुर येथे भरलेल्या दलित पॅथर चा मेळ्यात राजा ढाले नी पॅथर चा नावाचा राजकीय वापर होत आहे हे कारण देत 'मास मुव्हमेन्ट' नावाची संघटना काढली. तसेच ते सम्मक क्रांती संघटना चे संस्थापक सदस्य होते. दलित साहित्य ऐवजी आंबेडकरी साहित्य हि संज्ञा अधोरेखीत करावी यासाठी सर्व वैचारिक रसद राजाभाऊनी पुरवली होती. त्याचप्रमाणे अॅट्रासिटी चे खटले लढण्यासाठी सक्षम वकीलांचे राज्यव्यापी संघटन बांधण्याचा प्रयत्न देखील केला होता.
राजा ढाले हे भदंन्त आनंदजी कौसल्यांन यांच्या संपर्कात आल्यानंतर ते बुध्दविचांरांचे प्रखर पुरस्कर्ते झाले होते. ते उत्तम चित्रकार कवि देखील होते राजाभाऊ यांनी प्रस्थापित होण्याचा खटाटोप कधीही केला नाही तापसी, चक्रवर्ती,जातक,येरु या लघूअनियतकाली मध्ये त्याचा विद्रोह अपणास दिसुन येतो. राजाभाऊ ना २०१५ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार पुणे महापालिका ने दिला त्याचप्रमाणे मिलींद समता पुरस्कार हां पिपल्स एज्यूकेशन सोसायटी संचालित मिलींद कॉलेज औरंगाबाद दिलेला आहे तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव दिसुन येतो. मराठवाड़ा विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळवे यासाठीही नामांतर आंदोलनात देखील त्याचा सक्रीय सहभाग होता.
आंबेडकरी चळवळीतील वास्तव, संगठनात्मक लिखाणाचे काम त्यांनी केले आहे. आंबेडकरी चळवळ ही विचारांची असली पाहिजे असे मानणारे राजाभाऊ होते. लिखाणाचे विश्लेषण करण्यात त्याचे योगदान राहिलेले आहे. त्याच्या लिखाणाला शिस्त होती आंबेडकर चळवळ त्यातल्या त्यात दलित पॅथर या चळवळीला पुढे कम्युनिस्टांनी ही चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राजाभाऊ हे नेहमीच कम्युनिस्टाचे कड़वे टिकाकार राहिलेले आहेत. नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर पहिली समीक्षा राजाभाऊ नी केली होती.
बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे अध्यक्षपद देखील भुषविले होते.१९९९ साली ईशान्य मुंबई मतदार संघात निवडणुक लढवली होती. त्यात ते पराभुत झाले. मंडल आयोगाच्या प्रश्नावर देखील त्यांनी संघर्ष केला होता.
राजा भाऊ यांचे सहकारी दलित पॅथर चे संस्थापक सदस्य ज.वि.पवार 'आंबेडकरी चळवळी चा नी:स्पृह नेता आणि बाबासाहेब चा प्रवक्ता' असे राजाभाऊ चे वर्णन करतात.
दलित अन्याय अत्याचारा विरूध्द रस्त्यावरची लढाई व आपल्या प्रखर लेखणाच्या माध्यमातुन लढणारा खदखदणारा ज्वालामुखी एक अक्रमक पॅथर १६ जुलै २०१९ रोजी थंड झाला. राजाभाऊ परखड,काहीसे फटकळ परंतु तितकीच अंतर्यामी करूणा असणारे होते. क्रांती आणि शांती या एकमेकांच्या पोटातुनच येतात यावर त्याचा फार विश्वास होता. त्यांचा पहिल्या स्मृतिस विनम्र अभिवादन.
आविनाश सावंत.
संशोधक विद्यार्थी इतिहास विभाग.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ औरंगाबाद. तथा वंचित बहुजन अघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य.
Mo_9689572583/9511203326.
Comments
Post a Comment