कोणी वंदा कोणी निदां,लाँकडाउनवेळी चहा,पाण्याची सेवा देतोय वन हँड मँन बंदा.
परळी (प्रतिनिधी) -: कोरोना व्हाँयरसला प्रतिबंध करण्यासाठी परळी शहरात लाँकडाउन काळात जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावणाऱ्या प्रशासनाच्या विविध विभागातील योध्यांना एका हाताने अपंग
असलेल्या तरूणाच्या वतीने चहा पाणी व
नाष्ट्याची सोय सुरू केली असुन त्याचा या कार्याची प्रशंसा होत आहे.
कोविड19ला रोखण्यासाठी परळीत लाँकडाउन लागु केले गेले या काळात कोरोनाला रोखण्यासाठी डाँक्टर, परिचारीका व आरोग्य कर्मचारी रूग्णालयात सज्ज असुन पोलीस कर्मचारी,महसुल व न.प.चे कर्मचारी रस्त्यावर उतरून आप आपले मोर्चे सांभाळुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहे या लाँकडाउनच्या काळात शहरातील सर्व व्यवहार बंद असुन अशा वेळी शहरातील राजकिय पक्षाच्या वतीने गरजुनां अन्न,धान्य सामग्रीची घरोघरी जावुन मदत दिली गेली व त्याची प्रसारमाध्यमांनी दखल घेवुन प्रसिध्दी केली.मात्र या प्रसिध्दीला फाटा देत रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या प्रशासनांच्या सैनिकांसाठी नाष्टा,चहा व पाण्याची व्यवस्था मलिकपुरा भागात राहणारा सय्यद एजास हा एका हाताने अपंग वन हँड मँन असणारा तरूण निस्वार्थीपनाने करत असुन त्याचे हे कार्य प्रशंसनिय व इतरानां प्रेरणा देणारे असुन
त्याच्या कार्याची प्रशंसा होत आहे.
Comments
Post a Comment