अण्णाभाऊंचे समाजजागृतीचे कार्य सदैव प्रेरणादायी- निळकंठ चाटे


परळी वै. (प्रतिनिधी) :- लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतुन अशिक्षीत समाजाला विकासाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे.त्यांचे हे कार्य आजच्याच नव्हे सदैव काळात प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भाजपा युवानेते निळकंठ चाटे यांनी केले.

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त  निमीत्त बसस्थानक परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात भाजपा युवानेते निळकंठ चाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आला.कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंस पाळत हा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना निळकंठ चाटे म्हणाले की अण्णाभाऊंनी आपल्या लोकशाहिरीच्या माध्यमातुन दारिद्र्य,अन्यायात खिचपत पडलेल्या समाजाला लढण्याची शक्ती दिली.समाजात असलेल्या अनिष्ठ रुढी,परंपरा यांना कडाडून विरोध केला त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगीतले. यावेळी जितेंद्र मस्के, मुरलीधर पारवे, गणेश होळंबे, रोहित आबा मुंडे आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला