श्री काळभैरव देवस्थान परिसरात मांडवा येथील नोकरदार वर्गाकडून वृक्षलागवड


मांडवा (प्रतिनिधी) -: वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेकडे नऊ कि. मी. अंतरावर मांडवा (परळी) येथे श्री काळभैरवाचे मंदिर आहे. येथील मंदिर जिर्णोध्दाराचे काम अंतिम टप्यात आले आहे. बोरणा नदीच्या तिरावर असलेले हे श्री काळभैरवाचे मंदिर अजान वटवृक्षाच्या सावलीत स्थीत आहे. या मंदिराच्या परिसरात वृक्षलागवड करुन वनराई निर्माण करावी, अशी संकल्पना गावातील नोकरदार वर्गाने मांडली व  पूर्णत्वास नेण्याचा संकल्पही केला. या पर्यावरण विषयक उपक्रमात गावातील बहुतांश नोकरदार वर्ग उत्सफूर्तपणे सहभागी झाला व वर्गणीच्या रुपाने अर्थसहाय्य उभारुन मंदिर परिसरात वृक्षांची लागवड रविवारी करण्यात आली. येथे लावण्यात आलेली वृक्ष अनेक प्रकारची असून यामध्ये वड, नारळ, अशोक, चिंच, कदम, करंजी, पिंपळ, आपटा, आवळा , बेल,  पाम, फुला मध्ये चाफा, कणेरी , स्वस्तिक, व इतर .. याबरोबरच विविध फुलांची व शोभा वाढवणारी वृक्ष लावली आहेत. या वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी जाळी लावण्यात आली आहे. या वृक्ष लागवडीने मंदिर परिसरात सुंदर असे उद्यान निर्माण होईल व निसर्गाचे संवर्धन होईल अशी वनराई मंदिर परिसरात निर्माण केली आहे. या परिसरात लावलेल्या वृक्ष लागवडीचे गावातील सर्व गावकरी मंडळींनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले असून, असेच अनेक उपक्रम हाती घेण्याची सदिच्छाही व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला