लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन


बीड (प्रतीनिधी) -: जागतिक कीर्तीचे मराठी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त  सामाजिक उपक्रमाने साजरी करून महापुरुषांना एका आगळ्यावेगळ्या  उपक्रमाने जयंती साजरी करण्याचे आयोजन बीड येथे करण्याचे ठरवले  आहे जागतिक महामारी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अवाढव्य खर्च व्यतिरिक्त सामाजिक सलोखा सामाजिक उपक्रमाने अबाधित ठेवण्यासाठी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  जन्मशताब्दीनिमित्त  शासकीय रुग्णालय बीड येथे दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 ते 3पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरीही चळवळीतील युवा मित्र सहकारी आंबेडकरी तरुण बहुजन समाजातील युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महामानवाचे विचार तेवत ठेवण्याचे काम करावे .लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा विचारांचा उलगडा करण्यासाठी मराठी साहित्यातील,कादंबरी,पोवाडा  लोकनाट्य,प्रवासवर्णन असे अनेक साहित्य त्यांनी मोठ्या ताकतीने पहिले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोवाड्याच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा गोवा मुक्ती संग्रामातील चळवळ त्यांच्या कार्यातील काही अग्रस्थानी घडलेली घटना क्रम आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालून "जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव" हे त्यांचे लाख मोलाचे विचार आजही बहुजन समाजातील युवकांना प्रेरित करणारे आहेत... येत्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  विचारांची जयंती म्हणून युवक मित्रांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती वृत्तपत्राद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजक विष्णुबाळ झोडगे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर