प्रतिकारशक्तीवर्धक आयुर्वेदीक काढाचे अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत वितरणपरळी आयुर्वेदिक डाॅक्टर्स असोसिएशन व विश्वश्री आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र चा स्तुत्य उपक्रमप्रतिकारशक्ती वाढवूनच कोरोना वर मात करता येईल - आयुर्वेद तज्ञ डाॅ रविंद्र ईटके
परळी (प्रतिनिधी) -: परळी आयुर्वेदिक डाॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने कोरोना च्या या कठीण काळात अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी अशा जवळपास 500 जणांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आरोग्य रक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "प्रतिकारशक्ती वर्धक काढा" हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्यात आले.
कोरोना या रोगाच्या राष्ट्रीय संकटात आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी जे जे घटक सध्या लढा देत आहेत जसे की डाॅक्टर्स, हाॅस्पिटलचा सर्व स्टाफ, सफाई कामगार, नगर पालिका , तहसील, पोलिस दल, बॅंकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच या कठीण काळातही इत्यंभूत माहिती पुरविणारे पत्रकार बंधू , इ. ना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आरोग्य रक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "आयुष मंत्रालय, भारत सरकार" यांनी निर्देशित केलेल्या औषधी वनस्पती व विश्वश्री आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र च्या वतीने संशोधन करून तयार करण्यात आलेले प्रतिकारशक्ती वर्धक काढा हे आयुर्वेदिक औषध देण्यात आले.
हा औषधी काढा सांगितलेल्या पध्दतीने पिल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच दुष्ट कफाचे पाचन होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप इ. आजारावर पायबंद घातला जातो. पाचनतंत्राची कार्यक्षमता वाढून चांगला पाचक रस तयार होतो त्यामुळे पचन आणखीनच सुधारते. शरीरात तयार झालेले विषारी घटके लघवीवाटे बाहेर पडून शरीराची शुध्दी होते. रक्त धातुवर चांगले कार्य होवुन सर्व अवयवांना रक्त पुरवठा चांगला होतो. यामधील रसायन औषधांमुळे शरीरातील सप्तधातुंचे कार्य सुधारते तसेच सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढल्यामुळे शारीरिक व मानसिक बल टिकून राहते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढून शरीर कोणत्याही आजारास तोंड देण्यास सक्षम होते.
हा काढा लहान बाळांपासून वृध्द अशा सर्व वयातील स्त्री- पुरूषांना घेता येतो. तसेच डायाबिटीस, बी.पी., दमा, टी.बी, किडनीचे आजार, कॅन्सर, इ. आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही घेता येतो. होम क्वारंटाईन असलेले, किंवा कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांसाठी हे औषध विशेष लाभदायक आहे. फक्त औषधाचा डोस डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी जास्त प्रमाणात घ्यावा.
आज हे "प्रतिकारशक्ती वर्धक काढा " चे किट उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार श्री. डाॅ. विपीन पाटील साहेब, नायब तहसीलदार बी.एल.रुपनर, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मुंडे, वरील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच परळीतील पत्रकार महादेव शिंदे, संभाजी मुंडे, प्रकाश सुर्यकर, बालासाहेब कडबाने, राजेश साबणे, दत्तात्रय काळे, स्वानंद पाटील, सचिन भांडे, बालाजी ढगे आदि पत्रकारांना देण्यात आले. या प्रसंगी परळी आयुर्वेदिक डाॅक्टर्स असोसिएशन चे डाॅ. दिपक पाठक, डाॅ. शिवकुमार अंदुरे, डाॅ. तुषार पिंपळे, डाॅ. विश्वास भायेकर, डाॅ.भालचंद्र , डाॅ. रविंद्र ईटके आदि डाॅक्टर्स उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.अनुप भन्साळी, श्री.प्रकाश डांगे, सौ.रत्नमाला नानावटे, सौ. मिरा जाधव, कु. सपना बोकरे आदींचे विशेष सहकार्य लाभले.
सामान्यांसाठीही उपलब्ध
सर्वसामान्य नागरीकांसाठीही हा आयुर्वेदीक काढा माफक दरात उपलब्ध असून, त्यासाठी डाॅ. ईटके, पद्मावती गल्ली (7020721575), डाॅ.पिंपळे, मोंढा (9765733733), डाॅ.भायेकर,जलालपूर रोड (9822782314), डाॅ. अंदुरे, नाथ टाॅकीज समोर (9960701144), डाॅ. जब्दे , तळ विभाग (9420653201) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment