नागरिकांनी 'बकरी ईद' घरातच राहून साजरी करावी - जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड दि 23 :- मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वाचा बकरी ईद हा सण सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांनी घरीच नमाज अदा करून साजरा करावा, कोरोना संसर्गाचा धोका वाढला असल्याने या कालावधीत मस्जिद मध्ये जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व मुस्लिम धर्मीय धर्मगुरू आणि प्रतिनिधी यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बैठकीसाठी आले होते. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मीय धर्मगुरू आणि प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. 

यावेळी कोविड १९ विषाणू संसर्गाचे संकट वाढत असल्याने त्याविरूद्ध लढण्यासाठी सर्वांनी हिंम्मत ठेवून प्रशासनास सहकार्य करावे  तसेच बकरी ईद साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध मार्गदर्शक माहिती आणि सूचना लवकरच विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जातील आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले

बकरी ईद साजरी करताना गर्दी केली जाऊ नये असे यावेळी सांगण्यात आले जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काळजी घेण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून दिली जात आहे. या काळात आपण घरात राहूनच  आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे सांगण्यात आले

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला