फायनान्स कंपन्यांनाची दादागिरी खपवून घेणार नाही - संतोष जोगदंड ऑटो रिक्षा चालकांचे प्रचंड हाल,
बीड (प्रतिनिधी) दि.20 -: लॅाकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प पडल्याने प्रचंड आर्थिक तंगी सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे, ऑटो वाहनचालक , व इतर वाहने खरेदी करून त्याचे हप्ते फेडण्यासाठी अनेक अडचणी आल्या आहेत परंतु सर्व व्यवहार बंद असल्या मुळे वाहनधारकांना फायनान्स कंपनीचे हप्ते फेडणे व भरणे खूप अवघड झाले आहे, फायनान्स कंपनी ची दादागिरी थांबवा संतोष जोगदंड यांनी जिल्हाधिकार्यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
फेब्रुवारी महिन्या पासून कोरोना या जागतिक संसर्गजन्य आजार यामुळे सर्व उद्योग धंदा व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक कामांना स्थगिती आलेली आहे, यातच ज्यांनी प्रायव्हेट फायनान्स कंपन्या कडुन कर्ज घेतले आहे, अशा वाहन धारकांनी फायनान्स वरती वाहने खरेदी केले आहेत त्यांचे सर्व आर्थिक चक्र बिघडले आहे असल्यामुळे कुठलाही उद्योग-व्यवसाय नाही किंवा आर्थिक मिळत नसल्या मुळे खाजगी कंपन्यांचे हप्ते थकले आहेत व वसुलीचा बहाना पुढे करत आॅटोरिक्षा चालकांना व इतर वाहन चालकांना वसुलीच्या नावाखाली त्रास देणे सुरू केले आहे , दादागिरी करणे व वारंवार असे प्रकार वाढले आहे तरी या फायनान्स कंपनीच्या दादागिरीला आळा बसवण्यासाठी हप्ते भरण्यासाठी सवलत मिळावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा वतीने देण्यात आले आहे,
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते बबन वडमारे विजय गायकवाड, ज्ञानेश्वर कोठेकर, ऍड सदानंद वाघमारे, उमेश तुळवे, संदीप जाधव, लखन जोगदंड,अजय सरवदे, विश्वनाथ शरणागत, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment