प्रबुद्ध भारत व्याख्यान मालेचे उद्या पासून सुरुवात - प्रा.विष्णू जाधव


बीड (प्रतिनिधी) दि.21-: प्रबुद्ध भारत फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेची सुरुवात बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य भटक्या विमुक्तांचे महाराष्ट्राचे नेते प्रा. विष्णू जाधव यांच्या अभ्यासपूर्ण विचावंता मांडणीच्या व्याख्याना पासून होत आहे, लॉकडाऊन च्या काळात लोकांना एकत्र  येण्यास बंदी आहे कुठे ही परिषदा, मेळावे, परिसंवाद,सभा, घेता येत नाहीत पण अत्याधुनिक तंत्राचा वापर करत फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण जगातील जनतेला जोडले जाऊ शकतो म्हणून हा एक अभिनव प्रयोग केला जात आहे.

 लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र मध्ये नव्हे तर संपूर्ण देशात भटके विमुक्त, आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लिम, अल्पसंख्यांक लोकांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार वाढले आहेत या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर समाजाला देशाला दिशा देण्यासाठी प्रबुद्ध भारत लाईव्ह प्रबोधन झाले च्या च्या वतीने विविध क्षेत्रातील विचारवंत तज्ञ अशा व्यक्तींची व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्याचं पहिलं पुष्प गुंफण्याचा मान बीडचे लोकसभेचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांच्या पासून होत आहे, भटक्या-विमुक्त खाल्ले हा विषय त्यांना देण्यात आला आहे, त्यावर दिनांक 22 जुलै 2020 बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता प्रबुद्ध भारत या फेसबुक लाईव्ह पेजवर हे सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत, या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान प्रा.विष्णू जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला