राजगृहाची तोडफोड करणार्यांना अटक करुन कठोर कारवाई करा - गौतम साळवे
परळी (प्रतिनिधी) -: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह हे अनुयायांचे श्रध्दास्थान आहे. दादर, मुंबई येथील राजगृहावर काल अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत मोठे नुकसान केले आहे. विकृत मनोवृत्तीचा हा केवळ राजग्रहावरील हल्ला नसुन तो आम्हा अनुयायांच्या श्रध्देवर केलेला हल्ला होय शासनाने या घटनेतील आरोपींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतम साळवे यांनी केली आहे.
राजगृहावरील हल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावे या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी परळी यांना वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून या घटनेतील आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी, जिल्हा महासचिव शरद बचाटे, ज्येष्ठ नेते सुधाकर साळवे, विजय हजारे, रानबा गायकवाड, प्रेम जाधव, योगेश मुंडे, सतिष आदोडे, रतन सरवदे, भानुदास कांबळे, करण कांबळे, अमर तरकसे, मुंजाजी साळुंके, रोहन जाधव, कार्तीक कांबळेेेे आदींची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment