आव्हाड कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन


पुणे (दि. २७) - : पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या कुटुंबाची राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी ऍड. आव्हाड यांच्या स्मृतींना उजाळा देत ना. मुंडे यांनी ऍड. भास्करराव आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांचे नुकतेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले होते. 

पुणे आणि महाराष्ट्रातील विधी क्षेत्रात अनेक वकील घडवलेले ऍड. आव्हाड यांचे एनटी - ड आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक व विधी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट देऊन आव्हाड कुटुंबियांचे सांत्वन करत ऍड. भास्करराव आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण केली, यावेळी ऍड. अविनाश आव्हाड, कमलकाकू आव्हाड, आशिष पाटील यांसह आव्हाड कुटुंबीय उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर