पालकमंत्री च्या कर्मभूमीत सफाई कामगारांवर अन्याय - भाई गौतम आगळे
परळी(प्रत्तिनीधी) -: परळी नगर परिषद आस्थापनेत कंत्राटी सफाई कामगारांना तोडं दाबून बुक्याचा मार चालू आहे. मागील चार महिन्या पासून वेतन मिळाले नसल्या मुळे त्याच्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालकमंत्री च्या कर्मभूमीत सफाई कामगारांवर त्याचेंच कार्यकर्ते अन्याय करत आहेत असे कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी ऐका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
जिल्हयातील सर्व नगर परिषद/नगर पंचायत आस्थापनेत कार्यरत सफाई कामगारांना त्यांचे हक्काचे किमान तर देतच नाहीत, कमी वेतन देतात तेही चार-पाच महिने झाल्यावर देतात. बाकी प्रचलीत अदयावत कामगार कायदयाच्या सोयी सवलती तर फार लाबंच्या गोष्टी आहेत. सफाई कामगारांना किमान वेतना सहीत त्यांच्या सोख सोयी मिळण्या करीता जानेवारी २०२० ला जिल्हाधिकारी बीड कार्यालया समोर सफाई कामगारांचे आमरण उपोषण चालू होते. त्या वेळी सामाजिक न्यायमंत्री तथा बीडज़िल्हा पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी २६ जानेवारी २०२० ला उपोषणास बसलेले सफाई कामगारांना आपल्या सर्व मागण्या येत्या आठदिवसात पुर्ण करतो मला वेळ दया असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण सफाईकामगारांनी सोडले होते.२८फेब्रुवारी २०२० ला प्रकरणा चा निपटारा करण्यासाठी जिल्हाअधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस, सर्व मुख्याधिकारी, बीड नगर परिषद अध्यक्ष,रोजंदारी मजदुर सेना केन्द्रीय महासचिव भाई ग़ौतम आगळे,वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाअध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्यासह सफाई कामगांर प्रतिनीधी उपस्थितीत होते. या बैठकीत मा. जिल्हाअधिकारी यांनी कामगारांचे पुरावे मागितले ते सादर करुन सरकारी कामगार अधिकारी बीड, यांचा अभिप्राय व निवासी उपजिल्हाअधिकारी श्रीकांत गायकवाड यांचा अहवाल आपल्याकडे दिला त्या प्रमाने कामगारांना न्याय दयावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली. आज अशी परिस्थिती आहे की शासनाने वेग-वेगळे परिपत्रक काढून कंत्राटी / रोजंदारी सफाई कामगारांना तारले व पालक मंत्री , मा. जिल्हाअधिकारी,बीड यांनी मारले आहे. किमान वेतनाची मागणी केल्यामुळे बीड च्या सर्व सफाई कामगारांना तर माजलगांव व परळी वैजनाथ येथील कांही कामगारांना बे- कायदेशिरपणे कामावरुन कमी केले असून त्यांना किमान वेतन सुध्दा दिले नाही. त्या मुळे सफाई कामगारांच्या कुंटुबावर उपासमारीची वेळ आली आहे. पालकमंत्री व मा. जिल्हाअधिकारी यांचे जिल्हयातील सर्व मुख्याधिकारी ऎकत नाहीत का ? असा सवाल कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी केला आहे. शासनाने सफाई कामगारांसाठी वर्षाला दोन गणवेश, घरभाडे, धुलाई भत्ता, गमबुट, हैण्डक्लोज, मास्क ईत्यादी सोयी- सवलती तसेच किमान वेतना सहीत कंत्राटी / रोजंदारी सफाई कामगारां( नियम न व निर्मुलन) अधिनियम १९७० हा कल्याणकारी कायदा निर्मान करून कंत्राटी कामगारांचे होणारे शोषण थांबऊन त्यांना त्यांच्या सोयी- सुविधा प्राप्त करऊन देण्यासाठी विविध तरतूदी सदर अधिनियमान्वये करण्यात आल्या आहेत. त्याची काटेकोर पणे अंमलबजावनी करण्यासाठी मा. ना. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पंरतू दुर्दव्याची बाब अशी की हे सफाई कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे लक्ष वेधन्यासाठी सफाई कामगारांनी पुन्हा आंदोलन करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पालकमंत्री च्या कर्मभूमीत व जिल्हयात सफाई कामगारांवर अन्याय होत आहे.त्यांना तातकाळ न्याय दयावा. अन्यथा संघटनेच्या वतीने सफाई कामगार तीव्र आंदोलन करतील असा ईशारा रोजंदारी मजदुर सेना केन्द्रीय महासचिव भाई गौतम आगळे यांनी ऐका प्रसिध्दी पत्रक व सोशल मिडीया द्वारे दिला आहे.
Comments
Post a Comment