स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन साजरी करा बकरी ईद; धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा!


परळी (दि. ३१) -: बीड जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्याची बकरी ईद घरच्या घरी साजरी करावी या आवाहनासह जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यावर्षी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय सण - उत्सवांना ब्रेक लागला आहे. सर्व धर्मियांनी या कठीण काळात आपले विविध सण - उत्सव साधेपणाने व घरच्या घरी साजरे करून आदर्श निर्माण केला आहे. बकरी ईद च्या  संदेशाचा प्रत्यय देऊन मुस्लिम बांधवानी हा आदर्श उत्सव घरीच साजरा करावा असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, दिवसेंदिवस वाढत जाणारे हे आकडे चिंताजनक आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या सर्वत्र साजरी केली जाणारी बकरी ईद सुद्धा साधेपणाने साजरी करावी असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे.

कोणत्याही ठिकाणी गर्दी न करता कुर्बानी साठी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे रीतसर परवानगी घेऊनच कुर्बानी द्यावी, तसेच शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना  भेटण्याऐवजी समाज माध्यमांचा वापर करून एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात असेही ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर