महिला महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम
परळी वै.(प्रतिनिधी) -: येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम असून १२ वी बोर्ड परिक्षेत विज्ञान व कला शाखेचा निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.
शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचा निकालात दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थिनींनी यशाची परंपरा कायम ठेवत १२ वी बोर्ड परिक्षेत विज्ञान शाखेतून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान वैष्णवी बेदरकर (८५.२३), द्वितीय योगिता सोनटक्के (ता.८१.६९),तृतीय तनूजा देशमुख (६७.८४) तर कला शाखेतून प्रथम सुषमा दराडे (७३.३८), द्वितीय पुजा राठोड (७०.७६), तृतीय अश्विनी मुंडे (७०.६०) यांनी पटकावला असून विज्ञान शाखेतून विशेष प्राविण्यासह दोन विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २७ विद्यार्थिनी तर कला शाखेतून प्रथम श्रेणीत १८ विद्यार्थिनी आलेल्या आहेत. १२ वीचा महाविद्यालयाचा एकुण निकाल ७७ टक्के लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे मुख्य मार्गदर्शक अनिल देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ. आर.जे परळीकर सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment