राजगृहावर दगडफेक करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा - आर.एच. व्हावळे
परळी (प्रतिनिधी) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची काही जातीयवादी विकाराच्या माथेफिरूनी दगडफेक करून राजगृहा'च्या दर्शनी भागाची भयंकर अतोनात नासधूस केली.
हे कृत्य हेतुपुरस्कर रित्या केले असून या कृतीमागे मनुवादी विचाराचे राजकीय षड्यंत्र असावे
याचा महाराष्ट्र शासनाने तात्काळ सखोल तपास घेऊन त्या गुन्हेगारास अटक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लावण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आर.एच.व्हावळे यांनी केले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहा च्या कायमस्वरूपी रक्षणासाठी. पोलीस चौकी उभारण्यात यावी. ही कृती महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी. अन्यथा देशातील व राज्यातील भीमसैनिकांचा उद्रेक सागराच्या लाटेप्रमाणे उफाळून येईल. तेव्हा सरकारला परस्थिती नियंत्रणात आणणे अवघड जाईल हे महाराष्ट्र शासनाने गांभीर्यपूर्वक लक्षात ठेवावे.
Comments
Post a Comment