परळी शहरात किराणा सामानाची घरपोच सेवेसाठी प्रभाग, कॉलनी निहाय दुकानांची यादी जाहीर - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
नागरिकांना अत्यावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग, कॉलनी निहाय दुकानांची यादी जाहीर करणे आवश्यक होते .त्यामुळे परळी शहरातील प्रभाग, कॉलनी, गल्लीनिहाय संबंधित नेमलेल्या किराणा दुकानांचे नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक , दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नांव, मोबाईल क्रमांक निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
नागरिकांनी केवळ अत्यंत आवश्यक किराणा सामाना जसे की, (तेल, गहू, साखर, तांदूळ इ.) वस्तूंचीच मागणी त्यांच्यासाठी नेमलेल्या किराणा दुकानदार यांचेकडेच नोंदवावी. नागरिकांनी संबंधित दुकानदार यांच्याकडे अनावश्यक वस्तू (परफ्युम, कॉसमेटीक्स इ.) ची सामानाची मागणी करु नये. संबंधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकळी ०९.०० ते दु. १२.०० वा पर्यंत सामानाची घरपाच डिलव्हरी नियुक्त कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल. अशा सुचना संबंधित कर्मचारी व दुकानदार यांना देण्यात आलेल्या आहेत
नागरिकांनी दुकानदारांशी बीलाविषयी चर्चा करावी मग मागणी नोंदवावी. दुकानदारांकडे Paytm, Google pay किंवा ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करुन व्यवहार करावा. अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर त्यांच्याकडे समक्ष रक्कम स्वत: एका पॉकीटात भरावी व दयावी. दुकानदारांनी सदरील रक्कम काळजीपूर्वक हाताळावी. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल बांधावा, सॅनीटायझर, साबणाचा वारंवार वापर करावा. सामाजिक अंतर राखावे आणि कोवीड विषयक सर्व खबरदारी घ्यावी.
दुकानदारांनी सामानाचे दर जास्त आकारल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या नागरिकांचा त्यांच्या प्रभागातील दुकानदारांशी संपर्क होणार नाही. त्यांनी यादीतील संबंधित कर्मचारी यांचेशी त्यांच्या प्रभाग क्रमांकाप्रमाणे संपर्क साधावा.
परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/ कर्मचारी कोवीड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सदर बँकेमध्ये परळी शहर व परिसरातील अनेक नागरिकांची मोठया प्रमाणात ये-जा झाली असून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणेत आली आहे.
यामुळे परळी शहरातून इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार परळी शहरात ०८ दिवसांसाठी (१२ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या सह वरील आदेश लागू करण्यात आले आहे.
(सोबत--आदेशासह परळी शहरातील प्रभाग, कॉलनी, गल्लीनिहाय संबंधित दुकानांचे नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक, दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नांव, मोबाईल क्रमांक निहाय यादी )
Comments
Post a Comment