अंबाजोगाई येथील भू-माफियांशी संगनमत करून जमीन हडप करणाऱ्यांवर तहसीलदारांनी केला गुन्हा दाखल
अंबाजोगाई (प्रतिनिधी) -: मौजे अंबाजोगाई येथील शेपवाडी हद्दीतील जमीन सर्वे क्र.९७, १०२, १३४ मधील एकूण ३३ एकर जमीनीचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे प्रलंबित असून अंतिम आदेश झालेले नसताना मौजे शेपवाडी येथील विष्णू उमाजी शेप, संभाजी शेप, दिलीप शेप, भागवत शेप, वसंत शेप, देविदास शेप यांनी बीड येथील भूमाफिया काझी सिंघानी याच्याशी संगनमत करून दि.२२ जानेवरी २०२० रोजी एक जे. सी. बी. व ५ रोटा वेटर्स ट्रॅक्टर्सनी जमिनीची साफसफाई केली व वरील भूखंडावर गैरकायदेशीर ताबा करण्याचा प्रयत्न केला म्हणून जमिनीचे मूळ मालक अजीमुन्नीसा बेगम व साईदा बेगम यांचे वारसदार मोहोम्मद मकसूद मोहोम्मद मिस्कीन रा.हैद्राबाद, तेलंगणा राज्य व त्यांनी नेमलेले अधिकारपत्र धारक सैय्यद सादेक सैय्यद समद रा. परळी यांनी सादर प्रकरणाबाबत जाय मौक्यावर जाऊन भूखंडावर चालू असलेले काम थांबवण्याची विनंती केली. परंतु वरील इसमांनी काम थांबवण्यास नकार दिला म्हणून अधिकारपत्र धारक सय्यद सादेक यांनी दि.२३/०१/२०२० रोजी विभागीय आयुक्त, औरंगाबाद, जिल्हाधिकारी बीड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंबाजोगाई, पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, उपविभागीय पोलीस अधिकीरी, पोलीस निरीक्षक शहर अंबाजोगाई यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यावरून दक्ष तहसीलदार अंबाजोगाई यांनी दि.१५/०२/२०२० रोजी पोलीस निरीक्षक शहर यांना पत्र क्र.२०/MAG/कावि./७८ ने सदर भूखंडावर ताबा करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे अधिकार दिले त्यावरून पोलीस निरीक्षक यांनी दि.१९/०५/२०२० रोजी वरील इसमांवर कलम १०७ सी.आर. पी. सी. प्रमाणे कार्यवाही करून चॅप्टर केस क्र.१२१/२० प्रमाणे गुन्हा नोंद करून कायदेशीर कार्यवाही केली. पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार अंबाजोगाई यांचेकडे वर्ग केला. त्यावरून कार्यकारी दंडाधिकारी यांनी सी.आर. पी. सी. १११ प्रमाणे संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून प्रत्येकी ५०००/- रुपये दंड याप्रमाणे जामीन दिला. कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार अंबाजोगाई यांनी पत्र क्र.२०/CRPC/MAG/कावि./२०५अन्वये पुढील एक वर्षापर्यंत कसल्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही या अटी व शर्तींसह जामीन दिला. सदर प्रकरणात भूमाफियांचे धाबे दणाणले आहे तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी केस क्र.RCA४४/२०१६ अन्वये अपील दाखल आहे त्यावर अंतिम निर्णय न्यायालयाने दिलेले नसताना भूमाफियांनी हाताशी धरून, संगनमत करून कायद्याचे अवमान केले. सर्वे क्र.१०२, ९७, १३४ मौजे शेपवाडी तहत अंबाजोगाई येथील ३३ एकर जमीन कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी ठोस भूमिका घेऊन कार्यवाही केली म्हणून भूमाफियांचे धाबे दणाणले. वरील प्रकरणात मोहोम्मद मकसूद मोहोम्मद मिस्कीन व सय्यद सादेक सय्यद समद यांनी तक्रार दिली होती अशी सर्व माहिती सय्यद सादेक यांनी प्रसिद्दी पत्रकाद्वारे दिली.
Comments
Post a Comment