बीड जिल्ह्या रब्बी बरोबर खरीप पिक विमा योजनेतून वगळला - वसंतराव मुंडे
परळी (प्रतिनिधी) -: महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये पिक विमा कंपनी तीन वर्षाच्या मुदतीत शासनाबरोबर करार करून पीक विम्याचे काम चालू केले आहे परंतु खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी बीड जिल्हा साठी एकही कंपनीने पीक विम्याचे निविदा घेण्यास तयार नाही यास कृषी विभाग निष्क्रिय असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे महाराष्ट्रात पंतप्रधान पिक विमा योजना खरीप व रब्बी साठी लागू करण्या करिता बीड जिल्हा विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाकडे दि 15 /12 /2019 ला पत्रव्यवहार केला आहे त्यावर दि12 मार्च 2020 ला प्रधान सचिव कृषी विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून बीड जिल्हा पिक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी लेखी पत्र काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांना मा.एकनाथ डवले प्रधान सचिव कृषी विभाग मंत्रालय यांनी दिलेले आहे परंतु आजतागायत बीड जिल्ह्यासाठी कृषी विभाग पिक विमा साठी कंपनी देऊ शकले नाहीत करिता सर्वस्वी जबाबदारी कृषी विभागाची आहे केंद्र व राज्य सरकारच्या पिक विम्याच्या धोरणानुसार महाराष्ट्रात विमा कंपनीकडून ई निविदा मागविण्यात येते त्यामध्ये भारती ऑक्सा जनरल इन्शुरन्स रिलायन्स जनरल इन्शुरन्स इफको टोकियो जनरल इन्शुरन्स एच डी एफ सी एफ इग्रो इन्शुरन्स बजाज अलायन्स इन्शुरन्स भारतीय कृषी विमा कंपनी यांनी सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विमा कंपन्यांनी निविदा भरून पिक विमा संदर्भात खरीप हंगामासाठी तीन वर्षाचे करार करून प्रत्येक जिल्ह्याला विमा कंपनी काम चालू केले आहे 31 जुलै पर्यंत शेतकरी आपल्या शेतातील पीकनिहाय आणेवारी नुसार पिक विमा भरतात तसेच शासन स्तरावर विमा कंपनीला मोठ्या प्रमाणावर कायद्याचे संरक्षण देऊन काम करण्यासाठी संधी दिलेली आहे विम्याचे प्रस्ताव बोगस आढळल्यास कंपनीला कारवाई करण्याचे अधिकार दिले असून सातबारा आठ पिक नोंदी मध्ये खाडाखोड क्षेत्र वाढलेले असल्यास गुन्हे दाखल करण्याचे अधिकार तहसीलदार यांना दिले आहेत 31 जुलै पिक विमा उतरण्याची खरीप हंगामासाठी शेवटची तारीख आहे आज तागायत बीड जिल्ह्याचा पिक विमा योजनेमध्ये समाविष्ट नाही महाराष्ट्र शासनाकडे बीड जिल्हा विशेष बाब म्हणून पिक विमा समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी माहिती दिली
Comments
Post a Comment