उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताह आजपासून आजा नच ले. डान्स स्पर्धा ; स्पर्धकांनी व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन


परळी वै.(प्रतिनिधी) -: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात आजपासून आजा नच ले.... डान्स स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे.आज,(दि.१९)पासून ही स्पर्धा  सुरू होत आहे. आपले तीन मिनिटापर्यंत चे डान्स व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      लॉकडाउनचा काळ अधिक सुसह्य आणि आनंदी जावा म्हणून अबाल वृद्धाकरिता विविध ऑनलाईन स्पर्धा सेवासप्ताहात आयोजित केल्या आहेत. यामध्ये  आजा नच ले.... डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सर्व स्पर्धा या ऑनलाईन असून खुल्या गटासाठी असतील सर्व सहभागी स्पर्धकांना गौरवपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जातील. आज,(दि.१९)पासून  स्पर्धा  सुरू होत असुन आपले तीन मिनिटापर्यंत चे डान्स व्हिडिओ  संजय सुरवसे मो.क्र.९८५०७५८००१, व महेश परळीकर मो.क्र.९१७५९१७५५९ यांच्याकडे पाठवावेत.

     सेवा सप्ताहातील विविध सेवा उपक्रमांत व ऑनलाईन स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आधार प्रमाणीकरण तक्रार निवारणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन