बालकिर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज फड झळकले झी टॉकीजवर

 
परळी (प्रतिनिधी) -: येथील श्री संत जगमित्र नागा मंदिर या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेल्या कीर्तन सेवा झी टॉकीज चैनल वरून सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. दिनांक 13 जुलै पासून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री.ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांच्या कीर्तन सेवा झी टॉकीज वरून प्रसारित होत आहेत. काल दिनांक 15 रोजी डॉ  सुदाम महाराज पानेगावकर यांची कीर्तन सेवा झी टॉकीज वरून प्रसारित झाली .या किर्तन सेवेत महाराजांना मृदंगाची साथ करण्यासाठी परळी चे भूमिपुत्र असलेले बालकीर्तनकार श्री ह भ प प्रकाश महाराज फड यांची साथ लाभली होती.
प्रकाश महाराज फड यांना  बालपणापासूनच वारकरी संप्रदायाची आवड आहे.  वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांना मृदंग कलेची अतिशय आवड आहे. ज्ञानाई गुरुकुल देवला पुनर्वसन सेलू ह.भ.प.भागवताचार्य, ह.भ.प.शिवाजी महाराज खवणे आणि भागवताचार्य बापूसाहेब महाराज खवणे यांच्या मार्गदर्शना मध्ये प्रकाश महाराज फड यांची मृदंग साधना व किर्तन चालू होती. त्याचबरोबर आळंदी मध्ये सुद्धा राहून महाराजांचे अध्ययन सुरू आहे. सध्या ते सद्गुरू जोग महाराज संस्था वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहेत.
गेल्या सहा वर्षापासून ते बालकीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र भ्रमण करत असतात. मोठमोठ्या सप्ताहामध्ये त्यांच्या कीर्तन सेवा संपन्न झाले आहेत .महाराष्ट्रातील गाजलेल्या कीर्तन महोत्सवातही प्रकाश महाराज फड कीर्तनासाठी गेलेले आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे प्रकाश महाराज फड परळी येथे त्यांच्या राहत्या घरी निवांत होते .याच दरम्यान झी टॉकीज चैनल च्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातील किर्तन मालिकेचे शूटिंग जगमित्र नागा मंदिर येथे होत असल्याचे तुकाराम महाराज मुंडे यांच्याकडून समजले. आणि डॉ सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन सेवेला मृदंगसाथ  करण्यासाठी तुकाराम शास्त्रीनी प्रकाश महाराज यांना पाचारण केले.
 डॉ सुदाम महाराज पानेगावकर यांच्या कीर्तनात प्रकाश महाराज फड यांनी अतिशय सुंदर अशी मृदंग साथ केली. 
पानेगावकर महाराज हे स्वतः उत्कृष्ट गायक असल्यामुळे त्यांच्याकडे वारकरी चालींचा खजाना आहे .आणि योगायोगाने काल त्यांनी एडका मदन तो केवळ पंचानन या श्री संत एकनाथ महाराजांचे भारुडावरती कीर्तन सेवा केली. आणि या भारुडाला अतिशय कठीण अशी चाल लावली. त्या   चालीला सुद्धा प्रकाश महाराज फड यांनी सुंदर अशी  मृदंगसाथ केली या मृदंग साथीबद्दल महाराष्ट्रातून फोन करून ,मेसेज करुन भाविक मंडळी   प्रकाश महाराज फड यांचे अभिनंदन आणि कौतुक करत आहेत.
डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनीही फोन करून प्रकाश महाराजांच्या मृदंगसाथीचे कौतुक केले.
लवकरच झी टॉकीज च्या बालकिर्तन महोत्सवामध्ये प्रकाश महाराज फड कीर्तनकार म्हणून झी टॉकीज वर येणार आहेत. बाल कीर्तनकार प्रकाश महाराज फड यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असे आशीर्वाद सर्व नामवंत आणि आदरणीय महाराज मंडळींनी फोन करून दिले कालच्या कीर्तनात महाराजांना गायनसाथ  करण्यासाठी ह.भ.प.जगदिश महाराज सोनवणे, अशोक महाराज गित्ते नंदागौळकर व नामदेव महाराज आघाव दुसरबिडकर यांची उपस्थिती होती .तर सहगायक म्हणून संग्राम महाराज फड, आत्माराम मुंडे तळेगावकर, सदाशिव मुंडे तळेगावकर, ओमप्रकाश मुंडे तळेगावकर, ह.भ.प.अशोक महाराज मुंडे (खातगांवकर), ह.भ.प.वैभव महाराज कराड, आणि विणा घेण्या साठी गुटटे मामा परळीकर आदी मंडळींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला