पिक विमा भरण्यासाठी बीड जिल्ह्याला मुदतवाढ मिळणार नाही - वसंत मुंडे
परळी (प्रतिनिधी ) -: महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारकडे "खास बाब" म्हणून प्रस्ताव पंतप्रधान पिक विमा योजनेचा बीड जिल्ह्याचा पाठवून मान्यता मिळाल्यानंतर मुदत वाडी संदर्भात केंद्र सरकार पाठपुरावा करण्यात आला. परंतु बीड जिल्ह्याला 31 जुलै ही अंतिम तारीख पिक विमा भरण्याची असेल अशी माहिती शासनस्तरावरून प्राप्त झालेली आहे. काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी दिली आहे .तरी शेतकरी बांधवांनी 31 जुलै तारखेच्या आत सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले . एकनाथ डवले प्रधान सचिव , बा .की. रासकर ,उपसचिव गीता ताई शिंदे , अवर सचिव . महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांना मंत्रालयात चर्चा अधिकाऱ्यांसोबत केल्याची माहिती दिली आहे . बीड जिल्ह्यासाठी "खास बाब" म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना समावेश चालू हंगाम 2020 ते 2023 पर्यंत खरीप रब्बी पीक विम्यासाठी मान्यता देण्यात तीन वर्षाकरिता आलेली आहे . प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी "खास बाब "शेतकऱ्यांनी पीक संरक्षित रक्कम विमा हप्ता रक्कम कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्ता सबसिडी विमा संरक्षित रकमेचे 2% टक्के नगदी व्यापारी पिकासाठी 5% टक्के रक्कम भरायची आहे. त्यासाठी 7/12, 8अ चा उतारा ,आधार कार्ड, पीक पेरा प्रमाणपत्र व बँकेचे खाते पासबुक कागदपत्रे देणे बंधनकारक आहे .नियमानुसार विमा भरावा भारत सरकारची एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत प्रमाणिकपणे नियमाचे पालन करून शेतकरी बांधव पिक विमा योजना चा फायदा घेण्याचे आव्हान काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी केले आहे .
Comments
Post a Comment