मनशा गफ्फार शेख हिचे ९१ टक्के गुण घेऊन बारावी परीक्षेत घवघवीत यश. मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक गफ्फार शेख यांच्या मुलीचे यश
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक गफ्फार शेख यांची मुलगी मनशा शेख हिने माहे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत देवगिरी उच्च माध्यमिक विद्यालय औरंगाबाद येथून विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाली आहे.
कु. मनशा शेख हिने दहावीचे शिक्षण सेंट जॉन हायस्कूल औरंगाबाद येथे ८३ टक्के घेऊन विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाली होती.
तसेच तिने बारावीच्या वाणिज्य शाखेतून ६५० पैकी ५९४ गुण मिळवून ९१.३८ टक्के घेऊन उतीर्ण झाली आहे. सातत्याने कठोर मेहनत व परिश्रम आणि शिक्षक वृंदाकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे आपण यश संपादन केल्याचे तीने सांगितले. तिच्या या यशाबद्दल परळी कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख, माजलगाव न.प.चे नगरसेवक तौफिक पटेल, प्रा. अब्दुल सत्तार, अब्दुल खालेक, शेख जब्बार, अजमल सिद्दीकी, रिजवान फारूखी, मुदसिर खान, असलम पटेल, कौसर जबीन, सहेर शेख, महेर शेख, इनशा शेख यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment