कोरोनावर मात केलेल्यांनी आपला प्लाझमा देऊन कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी - डॉ.अभिजित सायंबर


आष्टी (प्रतिनिधी) -: सध्या जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस तयार करत आहेत परंतु लस तयार होईपर्यंत नागरिकांनी विनाकारण आपल्या घराबाहेर न पडता शासनाला सहकार्य करून आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी.ज्या रुग्णांनी कोरोना आजारवर मात केली आहे अशांनी आपला प्लाझमा देऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल,केईएम हाॕस्पीटलमध्ये एम.डी, झालेले फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ.अभिजित सायंबर यांनी केले.
डॉ.अभिजित सायंबर यांनी आयोजीत पञकारा परिषदेत हे मत व्यक्त केले. डाॕ.अभिजित सायंबर हे एमबीबीएस ,एम.डी. (फुफ्फुसरोग तज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, केईएम
मध्ये काम केलेले आहे. तज्ज्ञ डॉ.अभिजित सायंबर सध्या डाॕक्टरांना मार्गदर्शन करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण हे आष्टी शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुध्दा आढळूनं येत आहेत. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
ही संख्या रोखण्यासाठी शासन विविध प्रकारच्या उपाय योजना राबवित आहे.सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल डिस्टनसिंग,उत्तम प्रतीचे मास्क चेहऱ्यावर बांधावे,
बाहेरून आल्यावर सॅनिटायझरने हात धुवावीत,गर्दीत जाणे टाळावे, वाफ घेणे,जर कोणाला सर्दी झाली असेल, खोकला येत असेल, घशात खंवखव होत असेल, ताप येणे, नाकातून पाणी येणे, तीव्र डोके दुखी, मळमळ होणे असे लक्षण आढळून आल्यासं त्यांनी नजीकच्या रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, शुगर, किडनी विकार, दमा, श्वसनाचे विकार यांनी या काळात विशेषं काळजी घेतली पाहिजे. शासन वेळोवेळी नागरिकांना नियम पाळावे असे सरकार ,आरोग्य विभाग,जिल्हाधिकारी करीत आहेत. त्यास नागरिकांनी प्रतिसाद देणे आवश्यकं आहे. नागरीकांनी भीती न बाळगता नियम पाळावे असे आवाहन करत आहेत.डाॕ.सायंबर यांनी आजपर्यंत धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल,औरंगाबाद, पुणे, मुंबई तसेच विविध ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात 
कार्य केले आहे.अंबेजोगाई लातूर, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक म्हणूनही त्यांनी उत्कृष्टपणे  काम केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर