कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात भ्रष्ट राजकीय व प्रशासकीय आधिका-यांनी रचलेल्या षडयंत्राची उच्चस्तरीय तपासणी, कोरोनाच्या लढ्यासाठी आरोग्य विभागाला दिलेल्या ३३कोटी रूपयांचे लेखापरीक्षण करावे, शहरातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अस्वछ्तेमुळे साथीचे आजार पसरण्यास जबाबदार नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी उपजिल्हाधिकारी सुकटे यांना निवेदन
बीड (प्रतिनिधी) -: कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक यांना बदनाम करण्यासाठी भ्रष्ट राजकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय तपासणी, दै.दिव्यमराठी, औरंगाबाद प्रशासनाने दाखल गुन्हे मागे घ्या,कोरोनाच्या लढ्यासाठी आरोग्य विभागाला दिलेल्या ३३ कोटी रुपयांचे आडीट करणे, बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पडलेले खड्डे,वाढलेले अपघातांचे प्रमाण,कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शहरातील वरिष्ठ अधिकारी यांचे निवासस्थान सह शहरातील अस्वचछता व पसरणारे साथीचे आजार यास कारणीभूत नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका बीड यांच्या वर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच बोगस सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी कायद्यात बदल करून १ लाख रू दंड व ५ वर्ष कारावासाची शिक्षेत तरतूद करण्यात यावी.कारण सध्याच्या कायद्यानुसार पहिल्यांदा ५०० रु दंड व नंतर ६ ते १ महिना शिक्षा व हजार रुपये दंड आहे.परंतू कायद्यानुसार ३ वर्षाच्या आतील शिक्षेत अटक करण्याची तरतूद नाही, त्यामुळे कायद्याचा वचक राहीला नाही, त्यामुळे. फसवणूक करण्यास दुकानदार घाबरत नाहीत. तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या"राजगृह" मुंबई येथिल परिसरात तोडफोड करणारे आणि विनोद निर्मितीच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत शिवस्मारकाविषयी अपमानास्पद टिकाटीपन्नी करणा-या आग्रिमा जोशूआ व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आयोजक सौरभ घोष यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांनी वचनबद्ध रहावे:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
---------------------------------------------------------विरोधी पक्षनेते असताना मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन देऊन डॉ.अशोक थोरात हे अवैध गर्भपातातील आरोपी असुन त्यांना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आरोप कायम केलेले असताना , तसेच शासकीय नोकरीत पदावर असताना केज तालुक्यातील तांबवा गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली, तत्कालिन ग्रामविकास मंत्री यांचा उघड उघड निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता या प्रकरणी सर्व पुराव्यानिशी आपण तक्रार दाखल करून डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु आज आपण त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही यापाठिमागचे कारण कळु शकेल काय किंवा डॉ.अशोक थोरात यांना आपण विधानपरिषदेवर घेणार आहात याची तरी कल्पना द्यावी,
अन्यथा आपण व चनबध्द राहुन डां.अशोक थोरात यांच्यावर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत.यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, युनुस शेख, वंचित बहूजण आघाडी बीड तालुकाध्यक्ष, संजय जाधव, भारीप युवा शहराध्यक्ष बीड, राजतिलक वाघमारे, बसपा कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment