सामाजिक न्याय दिनानिमित्तमास्क,सॅनीटायझर व हॅन्डस फ्री स्टॅन्डचे वाटप - प्रशांत वासनिक


बीड (प्रतिनिधी) दि.25 -: सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील महत्वाच्या शासकीय कार्यालयामध्ये बीएसपी चे नेते प्रशांत वासनिक यांच्या वतीने, शासकीय कार्यालया मध्ये हॅन्डस फ्री स्टॅन्ड, मास्क, भेट देण्यात येत आहे, जनतेची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा ठिकाणी लावले जाणार आहे, सध्या बीड जिल्ह्यासह शहरात कोरोणाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत याचा सार्वजनिक संसर्गाचा धोका लक्षात घेता आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी स्व-खर्चातून या महत्त्वपूर्ण वरदळीच्या शासकीय कार्यालयां च्या प्रवेश द्वारा जवळ सर्वसामान्य जनतेसाठी  सुरक्षित  ठेवण्याच्या उद्देशाने हॅडस फ्री सॅनीटायगर स्टँड व सनीटायझर बॉटल्स व एक संपुर्ण सेठ दिला जाणार आहे , या स्टॅन्डचे वैशिष्ट्य असे आहे की हात न लावता फक्त पायाच्या दबावाने सॅनीटायझर हे वापर कर्त्याच्या व्यक्ती च्या हातामध्ये येतं त्यामुळे कुठलाही संसर्ग पसरत नाही, अशा शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या उपयोगाची हॅडस फ्री सॅनीटाझर स्टँड हे भेट केले जाणार आहे. 26 जुलै सामाजिक न्याय दिना निमित्त संपूर्ण देशभर साजरा केला जातो त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केला आहे, सोमवारदि27/07/2020 रोजी सकाळी 11:00 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड यांचे कार्यालय,रजिस्ट्री अॉफीस
येथे मस्क सॕनीटाजर व हँड्स फ्री स्टँडचे भेट देण्यात येणार आहे. तरी या सुविधेचा उपयोग कार्यालयात येणाऱ्या सर्वच जनतेने उपयोग करावा असे आव्हान प्रशांत वासनिक यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर