परळी शहर आणि संलग्न गावात कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू -जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड, (प्रतिनिधी):- परळी शहरातील  स्टेट बँक ऑफ इंडिया मधील अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत, या बँकेमध्ये परळी शहर  आणि  बँकेशी संलग्न  गावे  व परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क आलेला आहे. त्यामुळेे परळी शहर आणि या गावांमध्ये कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी  अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परळी शहर आणि तालुक्यातील बेलंबा बोधेगाव, दैठणा घाट, दाऊतपुरा, इंजेगाव,  जिरेवाडी , कावळ्याचीवाडी , कासारवाडी, कौडगाव घोडा, कौठळी, नंदनज नाथरा, परळी( ग्रा), पिंपळगावगाढे,  सारडगाव आणि  टाकळी आचार्य येथे कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे 
  
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह