परळीतील कोरोना बाधित परिसरात न.प.कडुन फवारणी - किशोर पारधे
परळी (प्रतिनिधी) -: परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बॕकेच्या शाखेतील पाच कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने त्या परिसरात नगर परिषदेच्या वतिने सोडियम हायको क्लोराइडने फवारणी करण्यात आली.
सामाजिक न्यायमंञी तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरुन न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड , नगरपरिषद मुख्याधिकारी श्री .अरविंद मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इतर कोढेही संसर्ग होऊ नये म्हणुन परळी नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी आज सकाळ पासुनच फवारणीच काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.आज सकाळी राणी लक्ष्मीबाई टावर ,पोष्ट लाईन,वैद्यनाथ शाॕपींग सेंटर ते भिमवाडीच्या परिसरात सोडियम हायको क्लोराइड ने फवारणी करण्यात आली
Comments
Post a Comment